TRENDING:

पायलट कसं व्हावं? मिळतो खूप जास्त पगार, वाचा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Last Updated:

संजीत कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची उंची किमान 5 फूट असावी. त्याच वेळी, वय किमान 16 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
पायलट
पायलट
advertisement

रांची : असे अनेक विद्यार्थी आहे, ज्यांना मोठे होऊन पायलट बनावे असे वाटते. काही विद्यार्थी तर 8 वीपासूनच पायलट बनण्याचे स्वप्न पाहतात. पण अनेकांना पायलट नेमके कसे होतात, यासाठी काय करावं लागतं, याबाबत माहिती नसते. त्यामुळे पायलट कसे होतात, कोणता कोर्स करावा, यासाठी किती पगार मिळतो, याबाबत जाणून घेऊयात.

झारखंड राज्यातील रांची येथील स्काय लाइन एव्हिएशन अकादमीचे एक्सपर्ट संजीत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, पायलट बनणे हे अनेक मुलांचे स्वप्न असते. तुम्ही पायलट होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये स्ट्राँग असणे आवश्यक आहे. तुम्हाला पीसीएममध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

advertisement

असे बना पायलट -

संजीत कुमार यांनी सांगितले की, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही पायलट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकता. मात्र, यासाठी सशस्त्र दल केंद्रीय वैद्यकीय आस्थापनेचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पायलट होण्यासाठी, तुम्हाला पायलट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. या परिक्षेत लेखी, वैद्यकीय परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश आहे.

advertisement

फीस किती -

पायलट होण्यासाठी सर्वप्रथम भारत सरकार मान्यताप्राप्त फ्लाइंग क्लबमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यानंतर तुम्हाला विद्यार्थी पायलट परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. फिसचा विचार केला असता तुम्हाला 1 वर्षासाठी सुमारे 40 ते 60 लाख रुपये फी द्यावी लागेल. पायलटचा कोर्स साधारण 2 वर्षांचा असतो.

inspiring news : 4 वर्षांचा असतानाच गेली दृष्टी, तरीही खचला नाही, आज झाला सरकारी शिक्षक, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट!

advertisement

या वयाचे असणे अनिवार्य -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

संजीत कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची उंची किमान 5 फूट असावी. त्याच वेळी, वय किमान 16 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे. उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार नसावा. तसेच त्याच्या डोळ्यांची दृष्टी चांगली असायला हवी आणि तो मानसिकदृष्ट्याही निरोगी असायला हवा, असे ते म्हणाले. पायलटच्या पगाराबाबत अनेकांना उत्सुकता असते. याबाबत ते म्हणाले की, देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये (डोमेस्टिक) सुरुवातीचा पगार दीड लाख रुपयांपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पॅकेजेस करोडोंमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
पायलट कसं व्हावं? मिळतो खूप जास्त पगार, वाचा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल