दुसरीकडे कोकण रेल्वेत मेगाभरती केली जाणार आहे. एकूण 190 जागांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. भारतीय रेल्वेने विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने 2024 साठी पॅरामेडिकल श्रेणीतील 1376 पदांसाठी भरती जाहीर केलीय.
बंपर भरती! मुंबई महापालिकेत 1846 पदे भरणार, ऑनलाईन करा अर्ज
advertisement
या भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर कऱण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवारांना रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.indianrailway.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पॅरामेडिकल श्रेणीतील रिक्त पदांचा तपशील
नर्सिंग सुप्रिटेन्डेन्ट - 713 पदे
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट - 07 पदे
ऑक्युपेशनल थेरपिस्ट - 02 पदे
ऑप्टोमेट्रिस्ट टेक्नीशियन - 02 पदे
प्रयोगशाळा असिसटन्ट - 27 पदे
हेल्थ आणि मलेरिया इन्स्टपेक्टर - 126
फार्मासिस्ट (Entry Grade) - 246
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
वैद्यकीय पदवी, डिप्लोमा, व्यापार संबंधित प्रमाणपत्र आवश्यक
उमेदवाराचं कमाल वय 33 वर्षं
आरक्षित श्रेणीतील उमेदवाराला वयात सवलत
UPSC : लॅटरल एन्ट्रीला स्थगिती, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्र्यांचं युपीएससीला पत्र
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कोकण रेल्वेत मेगा भरती होणार आहे . सिनियर सेक्शन इंजिनिअर पदासाठी 05 जागा, सिनियर सेक्शन इंजिनिअर पदासाठी 05 जागा, स्टेशन मास्टर पदासाठी 10 जागा अशा विविध जागांसाठी भरती होणार आहे. तसेच असिस्टंट लोको पायलट पदासाठी 15 जागा, पॉइंट्स मन पदासाठी 60 जागा अशा विविध जागा मिळून एकूण 190 जागांसाठी नोकरीची ही संधी आहे. या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे असणार आहे.