UPSC : लॅटरल एन्ट्रीला स्थगिती, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्र्यांचं युपीएससीला पत्र

Last Updated:

केंद्र सरकारने युपीएससी अंतर्गत लॅटरल भरतीला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने युपीएससीला पत्र पाठवलं आहे.

News18
News18
दिल्ली : केंद्र सरकारने युपीएससी अंतर्गत लॅटरल भरतीला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने युपीएससीला पत्र पाठवलं आहे. लॅटरल भरतीवर याआधीही प्रश्न उपस्थित गेले होते. आता थेट भरतीची जाहिरात काढल्यानंतर यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. शेवटी केंद्र सरकारने अशी भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या वतीने युपीएससी अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे.
युपीए सरकराच्या काळात ही भरती सुरू करण्यात आली होती असा उल्लेख केला. या पत्रात असं म्हटलं की, 2005 मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा लॅटरल एन्ट्रीसाठी शिफारस करण्यात आली होती. आता सतत यावर प्रश्न उपस्थित केले गेल्यानं थेट भरतीची जाहिरात रद्द केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
युपीएससीमार्फत होणाऱ्या लॅटरल एन्ट्रीवर विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी युपीएससी लॅटरल एन्ट्री आणि त्यात आरक्षण न दिल्यानं विरोध केला होता. यानंतर सरकारमधील इतर घटक पक्षांनीही आवाज उठवला. यानंतर आता सरकारने युपीएससीतील लॅटर एन्ट्रीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या/देश/
UPSC : लॅटरल एन्ट्रीला स्थगिती, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्र्यांचं युपीएससीला पत्र
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement