बंपर भरती! मुंबई महापालिकेत 1846 पदे भरणार, ऑनलाईन करा अर्ज

Last Updated:

मुंबई महापालिकेत तब्बल 1846 पदांची बंपर भरती निघाली आहे. ही पदे सरळसेवेतून भरण्यात येणार असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेत लीपिकांची महाभरती:-
मुंबई महापालिकेत लीपिकांची महाभरती:-
मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई महापालिकेत तब्बल 1846 पदांची बंपर भरती निघाली आहे. ही पदे सरळसेवेतून भरण्यात येणार असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लिपिक पदाच्या या भरतीसाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी तात्काळ अर्ज करावेत.
मुंबई महापालिकेच्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती https://www.mcgm.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली असून 9 सप्टेंबरला रात्री 11.49 वाजेपर्यंत अर्ज करता येतील. पाणीपुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने ही पदभरती करण्यात येत आहे.
advertisement
आरक्षित प्रवर्गानुसार जागा
अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती अ (49), भटक्या जमाती ब (54), भटक्या जमाती इ (39), भटक्या जमाती (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (185) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (125), खुला प्रवर्ग (56) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती केली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीये.
advertisement
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निदर्शनानुसार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शहर डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट क मधील रुपये 25,500-81,100 (पे मॅट्रिक्स एम -15) आदी भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या/करिअर/
बंपर भरती! मुंबई महापालिकेत 1846 पदे भरणार, ऑनलाईन करा अर्ज
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement