TRENDING:

Inspirational Story: सैनिक होतं आलं नाही! आता मोफत प्रशिक्षण देऊन 15 मुलांना भारतीय सेनेमध्ये पाठवलं, चहा विकणाऱ्या आकाशची कहाणी

Last Updated:

कधीकाळी चहा सोबत ब्रेड खाण्यासाठी देखील पैसे नसलेल्या आकाश डोंगरे याची स्वतःची करिअर अकॅडमी आहे. आतापर्यंत त्याने 15 मुलांना भारतीय सेनेमध्ये देशसेवेसाठी मोफत प्रशिक्षण देऊन पाठवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : कधीकाळी चहा सोबत ब्रेड खाण्यासाठी देखील पैसे नसलेल्या आकाश डोंगरे याची स्वतःची करिअर अकॅडमी आहे. आतापर्यंत त्याने 15 मुलांना भारतीय सेनेमध्ये देशसेवेसाठी मोफत प्रशिक्षण देऊन पाठवले आहे. आपल्या हातून आणखी विद्यार्थी घडावेत याच हेतूने त्याने मानेगाव येथे स्वतःची अकॅडमी सुरू केली आहे.
advertisement

स्वतःच सैनिक होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जिद्दीला पेटलेल्या या तरुणाने चहा व्यवसायातून ही प्रगती साधली आहेजास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सैनिक आणि पोलीस घडवण्याचे आकाश याचे स्वप्न आहे. आजही तो करिअर अकॅडमीचा संचालक आणि चहा विक्रेता अशा दोन्ही भूमिका बजावतो. पाहुयात त्याचा संघर्षमय प्रवास.

advertisement

माझे दहावीपर्यंतचे शिक्षण इथेच रामनगर येथे झालेत्यानंतर मला सेनेत जाऊन भारतमातेची सेवा करायची होती. यासाठी मांडवा येथे करिअर अकॅडमी देखील जॉइन केली होती. परंतु घरची हलाखीची परिस्थिती आणि कोविडमध्ये सुरू झालेले लॉकडाऊन यामुळे भरतीचे वय निघून गेले, असं आकाश सांगतो

advertisement

व्वा, याला म्हणायचं टॅलेंट! दामिनीने परसबागेत पिकवल्या तब्बल 17 भाज्या; सेंद्रिय शेतीचा भन्नाट प्रयोग

यानंतर मी उपजीविकेसाठी स्वतःचा चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू असताना सकाळी अनेक मुले ग्राउंडवर धावताना दिसायची. या मुलांना मी टिप्स देऊ लागलो. माझ्या अनेक टिप्स विद्यार्थ्यांना आवडू लागल्याने त्यांनी आम्हाला तुम्हीच शिकवा असा आग्रह धरला. मी दररोज विद्यार्थ्यांना शिकवू लागलोएकेक करत आतापर्यंत 13 विद्यार्थी अग्निवीर तरविद्यार्थी बीएसएफमध्ये दाखल झाले. या सर्व 15 विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण दिल्याबद्दल एक रुपयाही मी घेतला नाही.

advertisement

ग्रामीण भागातील विद्यार्थी सेनेत आणि पोलीस सेवेत जावेत यासाठी ग्रामीण भागातच म्हणजेच मानेगाव येथे स्वतःची करिअर अकॅडमी नुकतीच सुरू केली आहे. अत्यंत माफक दरात इथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जातेचहाचा व्यवसाय देखील रामनगर येथे सुरूच आहेचहाच्या व्यवसायातून दररोज दीड ते दोन हजारांची निव्वळ कमाई होते. या व्यवसायाच्या बळावरच मी करिअर अकॅडमी स्थापन करू शकलो. आजही दोन्ही व्यवसाय सांभाळत आहेअसे आकाश डोंगरे याने लोकल 18 शी बोलताना सांगितले.

advertisement

जास्तीत जास्त मुलांना भारतीय सेनेत आणि पोलीस सेवेत पाठवण्याचे आकाशचे स्वप्न आहे. एका करिअर अकॅडमीचा संचालक असून देखील सध्या तो चहाचा व्यवसाय करतो आहेचहा विक्रीतूनच आपण हे सर्व वैभव उभे करू शकल्याचे आकाश सांगतो. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर आपण काहीही करून दाखवू शकतो हे आकाश याने सिद्ध करून दाखवले.

मराठी बातम्या/करिअर/
Inspirational Story: सैनिक होतं आलं नाही! आता मोफत प्रशिक्षण देऊन 15 मुलांना भारतीय सेनेमध्ये पाठवलं, चहा विकणाऱ्या आकाशची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल