सोलापूर – जिद्द आणि कष्ट, मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणत्याही संकटावर मात करत उत्तुंग झेप घेता येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एक दिव्यांग तरुण आहे. मोहोळ तालुक्यातील कामती येथील केशव लक्ष्मण गायकवाड हा 12 वी नापास असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. मात्र, जिद्दीने तो 17 वर्षांपासून फॅब्रिकेशनचं काम करतोय. त्याचा संघर्ष आणि दीनचर्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
मोहोळ तालुक्यातील कामती या गावात केशव लक्ष्मण गायकवाड राहण्यास आहे. 12 वीत नापास झाल्यानंतर केशवने कामाचा शोध सुरू केला. दिव्यांग असूनही त्याने जिद्दीनं फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केशव हे शेतीसाठी बनवलेल्या अवजारांना बसून पेंट करत होते. या कामाचे त्यांना महिन्याला 2 हजार रुपये मिळत होते. गेल्या 17 वर्षांपासून तो चाचा फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क्स येथे काम करत आहे.
बापमाणूस! लग्न सोहळ्यात एकाचवेळी 52 मुलींना दिलं सोनं, आतापर्यंत 765 मुलींचं केलं कन्यादान
पेंटिंग काम करतानाच सुरू केलं वेल्डिंग
पेंटिंग काम करत करत केशव यांनी वेल्डिंग काम तसेच इतर कामेही शिकून घेतली. तर आज केशव यांना महिन्याला 15 हजार रुपये पगार असून वेल्डिंग, कटिंग, पेंटिंग तसेच इतर कामे देखील केशव चाचा फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क्समध्ये करतात. तसेच मी काम सुरू केल्यापासून आई-वडिलांना बाहेर काम करू देत नाही. मी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम आहे, याचा आनंद असल्याचं केशव सांगतो.
केशव म्हणतो...
केशव गायकवाड चाचा फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क्स मध्ये शेतीसाठी लागणारे अवजारे बनवण्याचं काम करत आहे. पेरणी यंत्र, डोजर, पंजे, तसेच इतर साहित्य बनवण्याचे काम करत आहे. शिक्षित अशिक्षित तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता लहान का होईना काम करावे किंवा स्वतःचा व्यवसाय करावा, असा सल्ला दिव्यांग केशव गायकवाड यांनी दिला आहे. केशव दोन्ही पायांनी दिव्यांग असला तरी कष्ट, मेहनत करून स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे.