कर्मचारी कार चालक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पद संख्या 28 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता : 1) इयत्ता 10 वी पास. 2) मोटार कारचा ड्रायव्हिंग परवाना 3) मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. यासाठी वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे इतकी आहे. अर्जासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. वेतनमान : रु.19,000/- ते रु.63,200/- असणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
advertisement
पिस्तुल डोक्यावर ठेवून वृद्धाकडून लुटले 10 कोटी, मुंबईतील घटनेमुळे खळबळ
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन स्वरुपाची आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001.
उद्घाटनानंतर अवघ्या महिन्यात अटल सेतू 10 तास राहणार बंद; कारण आलं समोर
महत्वाच्या सूचना :
भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
