छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेक तरुण-तरुणींचं पोलीस बनायचं स्वप्न असतं. आता लवकरच महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. पोलीस भरतीत शारीरिक चाचणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे यामध्ये चांगले गुण घेण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. त्यासाठी शारीरिक चाचणीची तयारी आणि योग्य आहार गरजेचा असतो. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षक समाधान लोंढे यांनी माहिती दिलीय.
advertisement
धावताना घाई नको
शारीरिक चाचणीसाठी मैदानावर कोणत्याही प्रकारची घाई करू नये. यामध्ये तुम्हाला 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग करावी लागते. त्यासाठी मैदानावर अगोदरच चांगला सराव करणे गरजेचे असते. तयारीसाठी शक्यतो रस्त्यावर धावणे टाळावे. त्यामुळे बऱ्याच अडचणींचा आणि दुखापतींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या मैदानावर धावणे हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. तिथं तुम्हाला चांगलं वर्कआउट करता येतं, असं प्रशिक्षक लोंढे सांगतात.
सतत मोबाईल, लॅपटॉप पाहणं ठरू शकतं धोकादायक, चष्मा लागण्यापूर्वी अशी घ्या काळजी, Video
गोळा फेक करताना हे लक्षात ठेवा
गोळा फेक करताना अनेक विद्यार्थी चुका करतात. गोळा फेक करताना अतिशय व्यवस्थित रित्या तुम्ही गोळा फेकची तयारी करायला पाहिजे. गोळा फेक करताना व्यवस्थित गोळा पकडण्याची तयारी करावी. या ठिकाणी बरीच मुलं चुका करतात. गोळा फेकताना गोळा व्यवस्थित हातामध्ये पकडावा. त्यानंतर फेकताना तुम्ही संपूर्ण जोर लावून गोळा फेकावा. यामुळे तुमचा गोळा फेक इव्हेंट देखील पूर्ण होईल. यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क देखील भेटतील.
मुलांमध्ये दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर व्हा सावध, असू शकतो या नावाचा गंभीर आजार VIDEO
शारीरिक चाचणीसाठी डाएट महत्त्वाचा
या भरतीमध्ये गोळा फेक आणि रनिंग नंतर तुमचं डायट देखील चांगला असावा. डायटमध्ये जे विद्यार्थी नॉनव्हेज खातात अशा विद्यार्थ्यांनी नॉनव्हेज खावं. पण जे विद्यार्थी नॉनव्हेज खात नाहीत, त्यांनी पनीर आणि सोयाबीनचा समावेश आहारात करावा. मटकी, चणे यासारख्या कडधान्यांचा देखील समावेश करावा. खजूर, कॉफी घेणेही फायदेशीर ठरते. आहारात फळांचा समावेश देखील महत्त्वाचा आहे. आहारावर लक्ष दिल्यास शरीरात एनर्जी चांगली राहते आणि शारीरिक चाचणी पूर्ण क्षमतेने देता येते, असेही प्रशिक्षक सागंतात.
दरम्यान, प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस भरतीची तयारी करावी. शारीरिक चाचणीसाठी मैदानावरील तयारी आणि उत्तम डाएट ठेवल्यास यश नक्की मिळेल.





