सोलापूर : जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडू नये, ही म्हणं आपण सर्वांनीच ऐकलीच असेल. ही म्हण सोलापुरातील नीट परिक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी अल्फिया पठाण हिच्यासाठी तंतोतंत लागू होते. अल्फियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर नीट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे सोलापुरातल्या झोपडपट्टीत राहणारी अल्फिया आता एमबीबीएस डॉक्टर होणार आहे.
advertisement
झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाचे नीट परीक्षेत यश
सोलापुरातल्या विजापूर नाका येथील झोपडपट्टी क्रमांक 2 येथे अल्फिया मुस्तफा पठाण राहण्यास आहे. अल्फियाची आई कपड्याच्या दुकानात कामाला आहे तर अल्फियाचे वडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. भाड्याच्या घरात राहून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाने यश संपादीत केले आहे. या यशामुळे सर्व स्तरातून अल्फियाचे कौतुक होत आहे.
शाब्बास पोट्टेहो, NEET परीक्षेत मिळवले पैकीच्या पैकी गुण, नागपूरच्या दोघांची कमाल
सम्राट अशोक शिक्षण संकुलात बालपणापासून शिक्षण घेतलेली अल्फिया पठाणने नीट 2024 परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवून उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले. त्यामुळे अल्फिया पठाण शासकीय महाविद्यालयातून पुढील एमबीबीएस शिक्षणासाठी पात्र झाली. 'मी नीट परीक्षेचा अभ्यास करताना फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या सोशल मीडियापासून लांब राहिले. मित्र-मैत्रिणी बरोबर गप्पा मारणेही बंद केले. जास्त वेळ मी अभ्यासाला दिला. त्यामुळे मला पाहिल्याचं प्रयत्नात यश मिळाले', असं अल्फिया सांगते.
पहिल्या प्रयत्नात अपयश, पण शेतकरी बापानं दिलं बळ, अखेर त्यानं करुन दाखवलं, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट
नीट या परीक्षेकरिता मला रमेश सुतकर संस्थापक-अध्यक्ष, सम्राट अशोक मंडळ, सोलापूर आणि अँड.अशोक ताजणे यांनी मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ विधीज्ञ, मुंबई उच्च न्यायालय यांनी अर्थसहाय्य केले, असं अल्फियाने सांगितले.





