TRENDING:

आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची नोकरी सोडली, शेवटी तरुणानं करुन दाखवलं!

Last Updated:

सात्विक श्रीवास्तव याचे वडील जगदीश श्रीवास्तव हे दस्तऐवज लेखक आहेत. तर आई चित्रा श्रीवास्तव गृहिणी आहेत. हरदोई येथील सात्विक श्रीवास्तव या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ भारतीय रेल्वेत अभियंता म्हणून नोकरी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवहरि दीक्षित, प्रतिनिधी
प्रेरणादायी बातमी
प्रेरणादायी बातमी
advertisement

हरदोई : असं म्हटलं जातं की, काम असे करावे की, लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. असेच एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. या तरुणाने तरुणांसमोर जो आदर्श उभा केला आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 25 वर्षांच्या या तरुणाने नेमकं काय केलं ते जाणून घेऊयात.

सात्विक श्रीवास्तव असे या तरुणाचे नाव आहे. त्याने यूपी पीसीएस 2023 परीक्षेत संपूर्ण राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. सात्विक श्रीवास्तव हा नबीपुरवा येथील रहिवासी आहे. बालपणापासून तो अभ्यासात हुशार होता. त्याने सांगितले की, त्याने दहावी आणि बारावीच्या परिक्षेतही टॉप केले होते. यानंतर त्याने एनआयटी जयपूर येथून बीटेकमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने पीसीएसची तयारी सुरू केली. त्याने अधिकारी बनावे, अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. यानंतर कठोर मेहनतीनंतर त्याने आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

advertisement

सात्विक श्रीवास्तव याचे वडील जगदीश श्रीवास्तव हे दस्तऐवज लेखक आहेत. तर आई चित्रा श्रीवास्तव गृहिणी आहेत. हरदोई येथील सात्विक श्रीवास्तव या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ भारतीय रेल्वेत अभियंता म्हणून नोकरी केली. मात्र, आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नव्हता. यामुळे त्याने रेल्वेची नोकरी सोडून आपल्या ध्येयाच्या दिशेने कामाला सुरुवात केली आणि शेवटी आज त्याच्या मेहनतीला यश आले.

advertisement

यूपी पीसीएसमध्ये तिसरा क्रमांक मिळवून आता 25 वर्षांचा सात्विक उपजिल्हाधिकारी झाला आहे. या यशानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अनेक जण त्याचे अभिनंदन करत आहेत. तसेच मिठाई वाटप केली जात आहे.

'या' नखांना इतक्या हलक्यात घेऊ नका अन्यथा होईल मोठं नुकसान, नेमकं काय कराल?

आपल्या अभ्यासाबाबत काय सांगितले -

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

सात्विक श्रीवास्तव याने सांगितले की, त्याने अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. जो काही वेळ मिळेल तो अभ्यासात लक्ष घातले. पीसीएस होण्यासाठी त्याला तीन टप्पे पार करायचे होते म्हणून त्याने स्वतःच्या धोरणावर आधारित अभ्यास सुरू केला. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रमाणेच प्रत्येक टप्प्यासाठी तयारी करावी लागली. पूर्वपरीक्षेबाबत त्याने सांगितले की, तो कमीत कमी सोर्स ठेवायचा आणि त्याची उजळणी करायचा. मेन्ससाठी उत्तर लिहिण्यावर खूप लक्ष केंद्रित केले पाहिजे. पूर्वपरीक्षेनंतर ते सुरू करू नका. उलट पूर्व परीक्षेपूर्वी तुमची मुख्य तयारी 75 ते 80 टक्के पूर्ण झाली पाहिजे. तसेच मुलाखत ही व्यक्तिमत्व चाचणी आहे असे त्याने सांगितले. कमी पुस्तके वाचली तरी चालेल. पण रोज वाचले तर यश नक्की मिळेल, असा सल्ला त्याने दिला.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची नोकरी सोडली, शेवटी तरुणानं करुन दाखवलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल