सध्या स्पाइसजेटमध्ये 9,000 कर्मचारी आहेत. या संदर्भात अधिक माहिती देणाऱ्या जाणकारांच्या सांगण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 60 कोटी रुपये खर्च होत असताना कर्मचारी कपात गरजेची होती. कंपनी सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.
सध्या स्पाइसजेट 30 विमानं ऑपरेट करत आहे. यामध्ये आठ विमानं परदेशी कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. विमानातले क्र्यू मेंबर आणि पायलटसुद्धा याच कंपनीनं पुरवले आहेत. स्पाइसजेटने नोकरकपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संदर्भात एअरलाइचे प्रवक्ते म्हणाले की, `कंपनीचा होणारा खर्च लक्षात घेऊनच तो कमी करण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.`
advertisement
विनावेतन काम करताहेत कर्मचारी
ईटीच्या रिपोर्टनुसार, अन्य एका व्यक्तीनं नोकरकपातीच्या अनुषंगाने सांगितलं की, कर्मचाऱ्यांना आधीपासूनच याबाबतचे फोन येणं सुरू झालं होतं. काही महिन्यांपासून स्पाइसजेट आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊ शकत नाहीये. अनेक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत जानेवारीचं वेतन मिळालं नाहीये. सुमारे 2,200 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे स्पाइसजेटचे प्रयत्न आहेत.
जाणकार सांगतात, की गुंतवणूकदारांनी कंपनीच्या योजनेमध्ये फारशी रुची दाखवलेली नाही. एअरलाइन्सचं म्हणणं असं आहे, की सगळा निधी वेळेवर मिळत आहे आणि आम्ही आम्हाला लागणारा निधी मिळविण्याबाबत योग्य मार्गाने प्रगती करत आहोत.
कधी काळी कंपनीकडे होती 118 विमानं
2019मध्ये कंपनी जेव्हा यशाच्या शिखरावर होती तेव्हा त्यांच्याकडे 118 विमानांचा ताफा होता आणि 16,000 कर्मचारी होते. त्यानंतर कंपनीला उतरती कळा लागली. बाजारात या कंपनीचा जवळचा प्रतिस्पर्धी अकासा एअर आहे. त्या कंपनीकडे 23 विमानांचा ताफा आणि 3,500 कर्मचारी आहेत. मागच्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयानं कंपनीचे माजी प्रवक्ते कलानिधी मारन आणि केएएल एअरवेजला सहा आठवड्यांच्या आत 50 कोटी रुपये भरायला सांगितले होते.
