आधुनिक युगातील गरज लक्षात घेता पारंपरिक कोर्सेस इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक याबरोबरच ई-व्हेईकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल फोटोग्राफी, ड्रोन टेक्नॉलॉजी, आणि सोलार टेक्निशियन, यांसारख्या कोर्सेसना प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी निर्माण झाली आहे, असे संत रोहिदास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दत्तात्रय पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Social Service: प्राध्यापक नोकरीसोडून बनला समाजसेवक, 20 वर्षांपासून करतोय काम, कारण आहे खास, Video
पारंपरिक कोर्सेस तसेच एआय टेक्नॉलॉजीचे कोर्सेस केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्रायव्हेट सेक्टर बरोबरच गव्हर्मेंट सेक्टरमध्ये देखील संधी मिळू शकतात. जेएसटी तसेच ओजेटी या प्लॅटफॉर्म अंतर्गत प्रत्यक्ष उद्योग आस्थापनेत काम करण्याची संधी प्राप्त होते आणि त्यातून स्टायफंड सुद्धा दिला जातो.
सध्याच्या स्थितीला विद्यार्थ्यांचा कल एआय क्षेत्राकडे जास्त आहे मात्र सर्वच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतील आणि संधी मिळतील असे नाही, प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांच्या गुणांकानुसार केली जाते. त्यामुळे पारंपरिक कोर्सेसमध्ये देखील मोठ्या संधी आहेत. आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण केली जाते तसेच सप्टेंबर पासून तासिका सुरू होतात त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन देखील प्राचार्य पाटील यांनी केले.