TRENDING:

यशस्वी वकील बनायचंय? लक्षात ठेवा या गोष्टी, करिअरमध्ये होईल फायदा

Last Updated:

अनेक विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेतात मात्र यशस्वी वकील बनण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा : प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिकून काहीतरी बनावं. यासाठी काही जण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतात, काही इंजिनिअर तर काही लोकांचे स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचे असते. यासाठी अनेक विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेतात मात्र यशस्वी वकील बनण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? यासंदर्भातच वर्ध्यातील अ‍ॅडव्होकेट दिनेश शर्मा यांनी माहिती दिलीये.

advertisement

भरपूर वाचन करा 

आयुष्यात वकिलीचं स्वप्न बघत असाल तर यशस्वी होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू वृत्ती पाहिजे. जितकी जास्त वाचनाची आवड आणि सवय असेल तितकी ती अर्ग्युमेंट करताना उपयोगी ठरेल. कारण रोज नवीन नविन कायदे येतात. सुप्रीम कोर्टाचे, उच्च न्यायालयाचे नवीन नवीन जजमेंट येतात. कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही सतत वाचन करत असाल तर हे लक्षात राहील. केवळ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना वाचलेल्या गोष्टी महत्वाच्या नाहीत तर अपडेट्स लक्षात ठेवाव्या लागतात, असं अ‍ॅडव्होकेट दिनेश शर्मा सांगतात.

advertisement

success story : बाप करतो शेती, पोरानं घेतली भरारी, पायलट होत कमावलं नाव, प्रेरणादायी कहाणी

नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय असावी 

यशस्वी वकील बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय असावी लागते. ग्राउंड रियालिटी कळली पाहिजे. जसजसे समोर उभे असताना तुम्हाला नवीन चॅलेंजेस येतात ते पॉइंट्स माहीत पडतात. आयुष्यात जितकं फिराल, जितकं जास्त कोर्टात हजर राहाल, जेव्हड्या मोठ्या वकिलांशी केस बद्दल कोर्टात भांडाल किंवा अर्ग्युमेंट कराल तेव्हडे तुम्ही शिकाल. तुमचं नॉलेज वाढेल आणि याच गोष्टी तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी उपयोगात येतील.

advertisement

भिशीच्या पैशात सुरू केला गृहउद्योग, महिला बचत गटाच्या माध्यमातून लाखोंची कमाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझे खूप मोठमोठ्या वकिलांशी भांडण झाले. वादविवाद झाले त्या प्रत्येक अनुभवातून मी संपन्न झालोय. आज मी त्या प्रत्येक वकिलांना माझा गुरू समजतो. कारण त्यांच्यामुळे मला जी शिकण्याची संधी मिळाली ती मला कॉलेजमध्ये मिळू शकली नसती. मोठ्या मोठ्या गोष्टी मी अर्ग्युमेंटमधून शिकलोय. त्यामुळे मी माझ्या सर्व ज्युनियर्सला एक सल्ला देईल की कोणतीही केस असो त्यात तुम्ही पूर्ण प्राण पणाला लावून टाका. नवीन नवीन कायदे वाचा नवीन जजमेंट्स वाचा आणि अर्ग्युमेंट ऐका. भाषा ऐका, शब्दसंग्रह बघा. हे माझे अनुभव आहेत, असे अ‍ॅडव्होकेट दिनेश शर्मा सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
यशस्वी वकील बनायचंय? लक्षात ठेवा या गोष्टी, करिअरमध्ये होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल