TRENDING:

अल्पवयीन मुलीचा छेड काढली, मुलासह आईची तुरुंगात रवानगी झाली; पोस्को कोर्टाकडून महत्त्वाचा निकाल

Last Updated:

शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीची 'तो' नेहमी रस्त्याने येता-जाता छेड काढता होता. एक दिवस दारू पिऊन त्याने हद्द पार केली, त्या मुलीच्या घरात घुसून...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बेळगाव : शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीची 'तो' नेहमी रस्त्याने येता-जाता छेड काढता होता. एक दिवस दारू पिऊन त्याने हद्द पार केली, त्या मुलीच्या घरात घुसून दारूच्या नशेत राडा घातला. त्यावेळी घाबरलेल्या आईना त्या मुलाच्या आईला फोन केला आणि मुलाच्या राड्याबद्दल सांगितलं तर, त्या मुलाच्या आईने उलट उद्धट उत्तरे दिली आणि वरून मुलाच्या कृत्याला पाठिशी घातलं. अखेर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली.
Crime News
Crime News
advertisement

पोस्को कोर्टाने दिली शिक्षा

या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलावर आणि आईवरही गुन्हा दाखल केला. पोस्को न्यायालयात त्या दोघांविरुद्ध दोषारोप दाखल केले. पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर न्यायलयाने मुलाला 3 वर्षांची आणि आईला 2 वर्षांची शिक्षा झाली.

मुलासहीत आईलाही जावं लागलं तुरुंगात

संबंधित घटनेतील आरोपी मुलाचे नाव प्रदीप नीलप्पा माळगी असून तो 32 वर्षांचा आहे. तर त्या मुलाच्या आईचे नाव यल्लव्वा नीलप्पा माळगी असून तिचे वय 48 वर्षे आहे. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आई आणि मुलाला तुरुंगात रवानगी केली. तर या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

advertisement

हे ही वाचा : 'तो' रिक्षाचालक निघाला सुसाट; ठोकलं तिघांना अन् फरपटत नेलं महिला पोलिसाला; साताऱ्यात घडला थरार!

हे ही वाचा : बायको अन् मेहुण्याने दिली माहिती; कर्नाटकात 'त्या' आरोपीला ठोकल्या बेड्या, निवृत्त शिक्षिकेची केली होती हत्या!

मराठी बातम्या/कोरोना/
अल्पवयीन मुलीचा छेड काढली, मुलासह आईची तुरुंगात रवानगी झाली; पोस्को कोर्टाकडून महत्त्वाचा निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल