बायको अन् मेहुण्याने दिली माहिती; कर्नाटकात 'त्या' आरोपीला ठोकल्या बेड्या, निवृत्त शिक्षिकेची केली होती हत्या!

Last Updated:

धामणवणे गावात एका निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने संपूर्ण परिसर हादरला होता. मारेकऱ्यांचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठा आव्हान होतं. पण पोलिसंनी तपासाचा सूत्रं वेगाने फिरवली आणि...

Chiplun Crime News
Chiplun Crime News
चिपळूण : धामणवणे गावात एका निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने संपूर्ण परिसर हादरला होता. मारेकऱ्यांचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठा आव्हान होतं. पण पोलिसंनी तपासाचा सूत्रं वेगाने फिरवली आणि त्याच दिवशी अनेकांची चौकशी सुरू केली. त्यात ट्रॅव्हल एजंट जयेश गोधळेकर याला अटक केली. त्याची चौकशी सुरू केली आणि आणखी एका आरोपीची माहिती पोलिसांनी मिळाली.
निवृत्त शिक्षिकेच्या खुनातील दुसरा आरोपी सापडला
या दुसऱ्या आरोपीचं नाव रविशंकर कांबळे असून साताऱ्यातील होता. पण साताऱ्यात पोलिसांनी तो सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या मोबाइलाचा सीडीआर मिळवला आणि त्यामध्ये कर्नाटकातील अनेक लोकांच्या तो संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कर्नाटक पोलिसांकडून माहिती मिळवली आणि एक पथक कर्नाटकात गेले.
कलबुर्गी ही त्याची सासरवाडी होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊ चौकशी केली, तर मेहुणा आणि पत्नीकडून त्याचा नेमका पत्ता सापडला. त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी रविशंकर कांबळेच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायलयात हजर केले असता, 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले की, या खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. लवकरच त्यांनी चोरलेला दागिने आणि वापरलेली दुचाकी जप्त करण्यात येणार आहे.
advertisement
राहत्या घरी झाला होता निवृत्त शिक्षकेचा खून
चिपळूण येथे एका सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच निर्घृण खून होता. वर्षा जोशी (वय-63) असे मृत शिक्षिकेचे नाव होते. त्या घरी एकट्यात राहत होत्या. वर्षा जोशी या त्यांच्या मैत्रिणींसोबत हैदराबाद येथे फिरायला जाणार होत्या. त्यांची मैत्रीण त्यांना वारंवार फोन करत होती, मात्र त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे मैत्रीण काळजीत पडली आणि तिने वर्षा यांच्या शेजाऱ्यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, त्यांना घरात वर्षा जोशी यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यात त्यांचे हातपाय घट्ट बांधलेले होते.
advertisement
कोण होत्या वर्षा जोशी?
वर्षा जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांचे पतीचे निधन अकरा वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना कोणतेही आपत्य नव्हते. त्यामुळे त्या घरात एकट्याच राहत असत. काल (गुरुवारी 7 ऑगस्टला) त्या मैत्रिणींसोबत फिरायला जाऊन काही आनंदाचे क्षण घालवणार होत्या, पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
बायको अन् मेहुण्याने दिली माहिती; कर्नाटकात 'त्या' आरोपीला ठोकल्या बेड्या, निवृत्त शिक्षिकेची केली होती हत्या!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement