वेटरचा क्रूरपणा! लाकडी दांडक्याने तरुणाला संपवलं; गुन्हा कबूल करत म्हणतो, "विनाकारण मारलं"

Last Updated:

कसलंही भांडण नाही, वाद नाही, विनाकारण एका हाॅटेलच्या वेटरने तरुणास बेदम मारहाण केली. काठीने केलेली मारहाणी इतकी क्रूर होती की...

Crime News
Crime News
जामखेड : कसलंही भांडण नाही, वाद नाही, विनाकारण एका हाॅटेलच्या वेटरने तरुणास बेदम मारहाण केली. काठीने केलेली मारहाणी इतकी क्रूर होती की, त्यातच तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील शिरुर फाटा येथील एका हाॅटेलमध्ये घडली. रविवारी रात्री (17 ऑगस्ट) ही घटना घडली आहे. ज्योतिराम शामराव काशीद (वय-36) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दीपक गुलाबराव सातपुते असे या वेटरचे नाव आहे.
वेटरकडून बेदम मारहाण
यासंदर्भात ज्योतिरामचा भाऊ लक्ष्मण काशीद (रा. काशीद वस्ती, सारोळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार ज्योतीराम ही रविवारी सायंकाळी मोबाईलवर बोलत घराबाहेर पडला. पण नंतर तो घरी परतलाच नाही. सकाळी फोन लावला ज्योतीरामला फोन लावला, तर फोन उचलला नाही. त्यानंतर कळलं की, सकाळी साडेनऊ वाजता ज्योतीरामला हाॅटेलमध्ये वेटरने बेदम मारहाण केलेली आहे. त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे. ही माहिती मिळाली आहे लक्ष्मण तातडीने घटनास्थळी पोहोचला.
advertisement
आरोपी म्हणाला, "विनाकारण मारलं"
घटनास्थळी रक्ताने बरबटलेली काठी दिसली. जामखेड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. पोलीस चौकशीत त्याने सांगितले की, त्याने ज्योतीरामला विनाकारण मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपी दीपक सातपुते हा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे राहतो.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
वेटरचा क्रूरपणा! लाकडी दांडक्याने तरुणाला संपवलं; गुन्हा कबूल करत म्हणतो, "विनाकारण मारलं"
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement