दारू पाजली, गळा चिरला, नंतर नदीत फेकून दिला... महिलेने प्रियकराचा केला गेम, छत्रपती संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

एका संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्या महिलेने आतेभाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रियकराची गळा चिरून हत्या केली. त्याचा मृतदेह 55 किलोमीटर लांब...

Crime News
Crime News
छत्रपती संभाजीनगर : एका संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्या महिलेने आतेभाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रियकराची गळा चिरून हत्या केली. त्याचा मृतदेह 55 किलोमीटर लांब एका ताडपत्रीत गुंडाळला आणि गोदावरी नदीत फेकून दिला. 15 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या प्रियकराचा मृतदेह अंगावर असणाऱ्या टॅटूमुळे ओळखण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. सचिन पुंडलिक औताडे (वय-32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याची प्रेयसी असणाऱ्या महिलेचे भारती रवींद्र दुबे (वय-34, रा. कॅनाॅट प्लेस) नाव आहे.
प्रेमात वाद उफळला आणि गेम केला 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती आणि सचिन एका संघटनेचे पदाधिकारी असून मागील 4 वर्षांपासून प्रेम संबंधात होते. पण त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. 31 जुलै रोजी जालन्यात एका लग्न समारंभात दोघेही उपस्थित होते. त्यानंतर ते दोघेही छत्रपती संभाजीनगर परतले. दोघांनी मिळून दारू खरेदी केली आणि भारतीच्या फ्लॅटवर पिण्यासाठी थांबले.
advertisement
त्यांच्या या दारूपार्टीत भारतीचा आतेभाऊ दुर्गेश मदत तिवारी (रा. खुलताबाद) सहभागी झाला. नंतर भारतीने अफरोज नावाच्या एका मित्रालाही बोलावून घेतले. दारू पित असताना सचिन आणि भारती यांच्या वाद सुरू झाला. वाद टोकाला इतका टोकाला गेला की, भारती, तिचा आतेभाऊ दुर्गेश आणि मित्र अफरोज या तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण केली. इतकंच नाहीतर त्याचा गळा चिरून हत्या केली. खून केल्यानंतर सचिनचा मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून पिशवीत गुंडाळला आणि तिघांनी मिळून 55 किलोमीटरचा प्रवास करत पैठणमधील गोदावरी नदीत फेकून दिला.
advertisement
टॅटूवरून ओळखून आला मृतदेह
सचिन 17 दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोक त्याचा घेत होते. 13 ऑगस्ट रोजी मुंगी नदीपात्रात एक मृतदेह आढळला. सचिनाच्या मानेवर 'भक्ती' आणि हातावर 'सचिन' असा टॅटू असल्याचे लक्षात आहे. यावरून पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. शरीरावर जखमा दिसल्यामुळे हत्या झाल्याचं स्पष्ट होतं. अहमदनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेला प्रकरणाची चौकशी आदेश दिले.
advertisement
सीसीटीव्ही आणि मोबाईलने आरोपी सापडले
गुन्हे शाखेने भारतीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आणि तिचे नाव समोर आले. 31 जुलैपासून भारती तिच्या फ्लॅटवर परतली नव्हती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात रात्री दीड वाजता हे तिघेही मृतदेह ताडपत्रीतून घेऊन जाताना दिसले. पुढे चौकशीतील समोर आले की, तिघांनी मिळून सचिनचा मृतदेह पैठणच्या पुलावरून गोदावरी नदीत फेकला.  हा मृतदेह 13 दिवसांनी 14 किलोमीटर वाहत मुंगी येथील नदीपात्रात आढळून आला.
advertisement
असा घेतली आरोपींचा शोध
भारतीने मोबाईल बंद करून ठेवले होते. पण एका मैत्रिणीला फोन केला आणि ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. ती आणि तिचा भाऊ साखरखेडा येथे असल्याचा दिसून आलं. पोलिसांनी एका शेतातून भारती तिचा भाऊ दुर्गेश याला ताब्यात घेतले. पण अफरोज तिथे नव्हता. तो गायब होते. परंतु ते चिखलठाणा परिसरात वाहनबाजारात आल्याचे कळल्यावर पोलिसांनी धाव घेतली. पण तिथून तो पसार झाला.
advertisement
शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेतला. तिने सर्व मोबाईल बंद ठेवले होते, परंतु तिने एका मैत्रिणीला फोन केला. याच फोनमुळे पोलीस साखरखेडा येथील एका शेतातून भारती आणि तिचा मामेभाऊ दुर्गेश यांना पकडू शकले. आरोपी अफरोज हा चार दिवसांपूर्वी चिकलठाणा येथील वाहन बाजारात दिसल्याचे कळल्यावर, पोलिसांनी तिथे धाव घेतली, परंतु तो पळून गेला होता.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
दारू पाजली, गळा चिरला, नंतर नदीत फेकून दिला... महिलेने प्रियकराचा केला गेम, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement