'सिरीयल' बाईक चोर! राज्यभरातून चोरल्या 15 दुचाकी; स्मशानातील 'तो' अड्डा उघड झाला आणि...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
तो राज्यभरातून दुचाकी चोरत होता. एका स्मशानभूमीच्या पडीक इमारतीत ठेवत होता. नंबर प्लेट बदलायचा, गाडीचा चेसी नंबरवर खाडाखोड करायचा आणि...
सोलापूर : तो राज्यभरातून दुचाकी चोरत होता. एका स्मशानभूमीच्या पडीक इमारतीत ठेवत होता. नंबर प्लेट बदलायचा, गाडीचा चेसी नंबरवर खाडाखोड करायचा आणि अवघ्या पाच-दहा हजारातं गाड्या विकायता. त्याने आत्तापर्यंत 15 गाड्या चोरल्या आहे. इतकंत नाहीतर त्याच्यावर आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हे कबूल
तर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नामदेव बनन चुनाडे (रा. अनिलनगर, पंढरपूर) सांगोल्यातील खडतरे गल्लीतून गाडी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेत 13 ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सुरूवातील तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला. अखेर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि 15 गाड्या चोरल्याची कबुल केले.
advertisement
7 लाखांच्या 15 गाड्या जप्त
नामदेव चुनाडे याने आत्तापर्यंत पुण्यातून 4, सांगलीतून 3, साताऱ्यातून 2, सोलापूर शहर, करमाळा, कराड आणि अहिल्यानगर येथून प्रत्येकी एक अशा 15 दुचाकी चोरल्या होत्या. या गाड्यांची एकूण किंमत 6 लाख 90 हजार असून सर्व गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा : महिलेचा खून करून पळत होते बाप-लेक, पण वाटतेच झाला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दुसरा ताब्यात
advertisement
हे ही वाचा : Solapur News: दुसरं लग्न झालं अन् 8 दिवसांत स्वतःला संपवलं, 'त्या' ड्रायव्हरने असं का केलं?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'सिरीयल' बाईक चोर! राज्यभरातून चोरल्या 15 दुचाकी; स्मशानातील 'तो' अड्डा उघड झाला आणि...


