Solapur News: दुसरं लग्न झालं अन् 8 दिवसांत स्वतःला संपवलं, 'त्या' ड्रायव्हरने असं का केलं?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
व्यवसायाने वाहन चालक असणाऱ्या एकाचा 8 दिवसांपूर्वी दुसरा विवाह झाला. मात्र, 8 दिवसांतून स्वतःच्या घरात...
सोलापूर : व्यवसायाने वाहन चालक असणाऱ्या एकाचा 8 दिवसांपूर्वी दुसरा विवाह झाला. मात्र, 8 दिवसांतून स्वतःच्या घरात नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
नातेवाईकांमुळे कळली धक्कादायक घटना
पोलिसांकडून मिळालेला माहितीनुसार मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव अमजद खान इस्माईल पठाण आहे. त्याचे वय 47 असून तो मेघश्यामनगरमध्ये राहतो. शनिवारी रात्री अमजदच्या घरी नातेवाईक आले होते. त्यावेळी घराचे दार बंद होते. नातेवाईकांना आवाज दिला, पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
अमजदने नाॅयलाॅनच्या दोरीने घेतला गळफास
शेवटी नातेवाईकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता अमजदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र दिसले. आत्महत्येची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून नाॅयलाॅनची दोरी कापून मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.
advertisement
हे ही वाचा : अचानक-भयानक! मध्यरात्री 'त्या' लॉजवर पडली पोलिसांची धाड, उडाला गोंधळ आणि नको त्या अवस्थेत...
हे ही वाचा : महिलेचा खून करून पळत होते बाप-लेक, पण वाटतेच झाला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दुसरा ताब्यात
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 2:38 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Solapur News: दुसरं लग्न झालं अन् 8 दिवसांत स्वतःला संपवलं, 'त्या' ड्रायव्हरने असं का केलं?