'तो' रिक्षाचालक निघाला सुसाट; ठोकलं तिघांना अन् फरपटत नेलं महिला पोलिसाला; साताऱ्यात घडला थरार!

Last Updated:

दोन-तीन जणांना ठोकून रिक्षाचालक रस्त्याने सुसाट वेगाने चालला होता. या घटनेची माहिती महिला पोलिसाला मिळाली. पुढच्या चौकात रिक्षावर ...

AI Image
AI Image
सातारा : दोन-तीन जणांना ठोकून रिक्षाचालक रस्त्याने सुसाट वेगाने चालला होता. या घटनेची माहिती महिला पोलिसाला मिळाली. पुढच्या चौकात रिक्षावर नजर ठेवलेल्या महिला पोलिसांला ती रिक्षा दिसली. त्यांनी त्या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांना न जुमानता तो चालक सुसाट चालला. एका दुचाकीस्वाराच्या मदतीने महिला पोलिसाने त्याचा पाठलाग सुरू केला.
महिला पोलिसाला फरपटत नेलं
चालू गाडीवर त्यांनी रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचालकाने त्यांचा हात झटकला. त्यामुळे महिला पोलीस पडला, त्याचा जर्किंगची टोपी रिक्षाच्या बंपरमध्ये सापडली आणि त्या रिक्षाच्या मागोमाग फरपटू लागल्या. हा प्रकार पाहून रस्त्यावरचे नागरिक ओरडू लागले. काही अंतरावर गेल्यानंतर एका तरुणाने रिक्षाचा हँडल ओढला आणि रिक्षा थांबली. त्या घटनेत महिला पोलीस गंभीर जखमी झालेल्या आहेत. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतला आहे.
advertisement
2-3 जणांना धडक देऊन रिक्षाचालक थांबला नाही
ही धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाचा माळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. जखमी झालेल्या महिला पोलिसाचे नाव भाग्यश्री जाधव असे आहे. त्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळचा ओढा परिसरात 2-3 जणांना धडक देऊन एक रिक्षाचालक एसटी स्टॅण्डच्या दिशेने आलेला आहे, अशी माहिती जाधव यांना मिळाली. त्या चौकात जाधव रिक्षाची वाटच बघत होत्या. समोर ती रिक्षा येताना दिसताच त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचालक थांबला नाही.
advertisement
अखेर रिक्षाचा हँडल ओढला आणि अनर्थ टळला
तो रिक्षाचालक खंडोबाचा माळ या रस्त्याने सुसाट निघाला. त्यानंतर जाधव यांनी रस्त्यावरील एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या पाठीमागे बसून पाठलाग सुरू केला. पण रिक्षाचालकांना जाधव यांचा हात झटकला, त्या पडल्या. त्यांची जर्किंगची टोपी रिक्षाच्या बंपरमध्ये सापडली, त्या फरपटू लागल्या. तरीही रिक्षाचालक सुसाट होता. अखेर रस्त्यावरील लोकांच्या ओरडण्यामुळे एका तरुणाने हँडल ओढला आणि रिक्षा थांबवली. यात जाधव गंभीर जखमी झाला.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'तो' रिक्षाचालक निघाला सुसाट; ठोकलं तिघांना अन् फरपटत नेलं महिला पोलिसाला; साताऱ्यात घडला थरार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement