मिरवणुकीत उलटवला यल्लामाचा जग
सोमवारी दुपारी धार्मिक विधीच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी मानाच्या जागांची मिरवणूक काढली होती. पंचगंगा नदीच्या काठावरून निघालेल्या या मिरवणुकीत पुढे जाण्यावरून आणि 'जग उलटल्यावरून' त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा वाद मिटवून मिरवणूक मागे घेतली होती. पण वादाची ठिणगी तिथेच विझली नाही. संध्याकाळी ओढ्यावरील यल्लमा मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा दोन्ही गट मंदिराचा ताबा घेण्यावरून भिडले. हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
advertisement
पोलिसांवरही धावून गेले तृतीयपंथी
या प्रकाराची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही आक्रमक तृतीयपंथीयांनी पोलिसांवरच धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांना तिथून हाकलून लावले.
पोलिसांनी बळाचा वापर करताच एका गटातील तृतीयपंथीय निघून गेले. पण दुसऱ्या गटातील लोक यल्लमा मंदिराच्या आसपासच्या घरांमध्ये थांबले होते. रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. रात्री उशिरा शीघ्र कृती दलाची (Rapid Action Force) एक तुकडीही मदतीला बोलावण्यात आली.
हे ही वाचा : फोनवर बोलली, मग दरवाजा बंद केला... गायत्रीने उचललं टोकाचं पाऊल, गर्ल्स हाॅस्टेलमध्ये पसरली भयाण शांतता!
हे ही वाचा : Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!