दिनेश उर्फ गोलू उईके असं अटक केलेल्या 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी दिनेश यानेच पीडित तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीनं आधी 17 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केली, अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 पीडित मुलगा गुरुवारी रात्री दहा वाजता घराबाहेर गेला होता. संभोरा चौकातून परत येतो, असं त्याने आपल्या वडिलांना सांगितलं होतं. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे पीडित तरुणाच्या आई वडिलांनी मोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी अमरावती मोर्शी रस्त्यावरील येरला गावाजवळ तरुणाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. रस्त्यावरून जाणाऱ्या काहीजणांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जिथे तरुणाचा मृतदेह आढळून आला, त्याच शेतात त्याच्या चपला आणि पँट पोलिसांना आढळून आली आहे. तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मृत मुलगा हा मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ परिसरातील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश उईके याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
