आकाश मोरेच्या हत्येनंतर आता सोशल मीडियावर त्याचे जुने रील्स व्हायरल होत आहेत. ज्यात आकाश आपल्या कथित शत्रूंना धमकी देताना दिसत आहे. २५ जून रोजी अपलोड केलेल्या एका रीलमध्ये आकाश लवकरच कुणाची तरी फिल्डिंग लागणार आहे. ३०२ अर्थात हत्येची बातमी येणार आहे, असंही तो हिंदीतून रीलमध्ये बोलताना दिसत आहे.
रील्समध्ये नक्की काय म्हणाला?
advertisement
२५ जून रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या रीलमध्ये आकाश मोरे म्हणाला की, "बहुत जल्द किसी की फिल्डिंग लगनेवाली है. जरा रुको ३०२ की खबर आनेवाली है, खबर कैसी... रोक आणि ठोक...", याशिवाय हत्याच्या दोन दिवस आधी त्याने आणखी एक फोटो अपलोड केला होता. ज्यात तो "बदला लेने में देरी हो सकती है, लेकीन उसे भुलाया नही जा सकता" असं म्हणताना दिसत आहे.
आकाशने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ठेवलेली रील ठरली हत्येचं कारण?
याशिवाय हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हणतो – "शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोख ठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर काहीच तासांत हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही हत्या वर्चस्ववादातून झाली का? याचाही तपास पोलीस करत आहेत. याच रील्सच्या कारणातून त्याची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोळीबाराची भयावहता, डोक्यावर, छातीवर, पाठीवर तब्बल १२ गोळ्या !
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत. कपाळावर १, डोक्यावर ४, पाठीवर ४, छातीवर १, डोक्याच्या मागे २ अशा एकूण १२ राउंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. किशोरवर तब्बल 12 गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली होती.
आरोपींचा थरकाप आणि नंतरचा आत्मसमर्पण !
हत्यानंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले. मात्र, त्यांच्यामागे काही लोक असल्याची शंका त्यांना आल्याने आणि कदाचित स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाल्याने ते थेट जामनेर पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ते म्हसावद-नेरी मार्गे पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले. त्यावेळी ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि पोलिस स्टेशन कुठे आहे, अशी विचारणा करत उभे होते. अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वाळू व्यवसायाचा की वैयक्तिक वाद?
या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद, वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना यांचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल डिटेल्स व सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जात आहे. पाचोरा शहरात या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
