TRENDING:

गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या कुणाशी ठरलं, तिने विरोधही केला नाही, बॉयफ्रेंडने जे केलं ते हादरवणारं

Last Updated:

13 फेब्रुवारीला नेहा हिचे लग्न होणार होते. मात्र, तिच्या लग्नाची माहिती टिटूला मिळाली. दोन्ही एकाच शाळेत शिकायचे. तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. मात्र, नेहा हिचे लग्न ठरल्याचे माहिती झाल्यावर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत कुमार, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

बुलंदशहर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टीटू वीर सिंह नावाचा तरुण आणि नेहा विजयपाल नावाच्या तरुणीचे मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोन्ही एकाच गावातील आणि एकाच गल्लीतील रहिवासी होते. त्या दोघांनी एकमेकांसाठी जगण्या-मरणाची शपथ घेतली होती. मात्र, नेहाचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरले. नेहाच्या मनात प्रियकराविषयी प्रेम असतानाही ती आपल्या कुटुंबीयांना सत्य सांगू शकली नाही तसेच दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्यानंतरही तिने या लग्नाला विरोध केला नाही. यामुळे नेहा आणि टीटूच्या प्रेमसंबंधांचा अंत फार भयानक झाला.

advertisement

नेहाचे लग्न ठरल्याची माहिती तिचा प्रियकर टीटूला मिळाली होती. यानंतर टीटूने एक धक्कादायक निर्णय घेतला. ही घटना नयावास गावातील आहे. याठिकाणी टीटूने त्याची प्रेयसी नेहा हिचे लग्न झाल्यामुळे त्याला भयंकर राग आला होता. या रागातून त्याने त्याची प्रेयसी नेहा हिची गोळी झाडत हत्या केली. यानंतर स्वत:लाही गोळी झाडत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेत दोन्ही प्रियकर प्रेयसीचा मृत्यू झाला.

advertisement

दोन्ही एकाच शाळेत शिकायचे. तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. 13 फेब्रुवारीला नेहा हिचे लग्न होणार होते. मात्र, तिच्या लग्नाची माहिती टिटूला मिळाली. नेहा हिचे लग्न ठरल्याचे माहिती झाल्यावर त्याने थेट तिच्या घरी येत प्रेयसी नेहा हिच्यावर गोळी झाडत तिची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली. मागील 5 वर्षांच्या प्रेमकहाणीचा हा अंत अगदी 50 सेकंदात झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

नेहा हिचे वय 28 तर तिच्या प्रियकराचे वय 30 असे होते. मागील 5 वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रेयसीचे लग्न ठरल्याचा राग मनात धरुन त्याने हे हादरवणारे पाऊल उचलले. दरम्यान याबाबत माहिती देताना बुलंदशहराचे पोलीस अधीक्षक शंकर प्रसाद यांनी सांगितले की, एका तरुणाने एका तरुणीने गोळी मारत स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना प्रेमप्रकरणातील असल्याचे समजत आहे. तरुणीच्या घरुन दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरुन बंदूकही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या कुणाशी ठरलं, तिने विरोधही केला नाही, बॉयफ्रेंडने जे केलं ते हादरवणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल