ही हृदयद्रावक घटना इस्लामपूर येथे घडली. पेठनाका येथील आकाश चंद्रकांत बाबर (वय-27) याचे बुधवारी लग्न होते. आदल्या रात्री त्याचा भाऊ आणि मित्रमंडळी खांबे मळा परिसरात इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत होते. होणाऱ्या नवऱ्यालाही ते शूटिंग पाहण्याचा मोह आवरला नाही आणि तो त्याचा मित्र हर्षद सकटे (वय-21) याला घेऊन तिथे पोहोचला. सकाळी लग्न असल्याने मित्रांनी त्याची चेष्टा-मस्करी केली. तो क्षण त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.
advertisement
रात्री उशिरा आकाश आणि हर्षद दुचाकीवरून पेठनाक्याकडे परतत होते. इस्लामपूर बसस्थानकासमोर एका भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आकाशचा जागीच मृत्यू झाला. ज्याच्या डोक्यावर लग्नाचा फेटा चढणार होता, तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्याचा मित्र हर्षद गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर निर्दयी मोटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे बाबर कुटुंबावर आणि पेठनाका गावावर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : मुलीची छेड काढल्याचा संशय, नातेवाईकांकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; तरूणाचा अंत
हे ही वाचा : रिक्षा वाहून गेली, ३ प्रवाशांचा शोध सुरू, पण 'या' व्यक्तीला एका झाडानं वाचवलं, वाचा अंगावर शहारे आणणारी कहाणी!