घरात घुसून असा मारला डल्ला
घटनेची माहिती अशी की, एका गावातील दाम्पत्याला एका अनोळखी व्यक्तीने मूल होण्यासाठी औषध देण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी काही धार्मिक विधी करावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार, तो भामटा त्या दाम्पत्याच्या घरी आला आणि त्याने पती-पत्नीला घरातील देवघरासमोर बसवले.
यावेळी त्याने त्यांना अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून एका ब्लाऊज पीसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर, त्याने ते दागिने एका पितळी हंड्यात ठेवल्याचा बहाणा केला. त्याने दाम्पत्याला सांगितले की, 'मी मंदिरात जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही 20 मिनिटे जागेवरून हलू नका.'
advertisement
...अन् दागिने घेऊन फरार
त्यानंतर तो भामटा तिथून पळून गेला. बराच वेळ वाट पाहूनही तो परत आला नाही, तेव्हा दाम्पत्याने हंड्यात पाहिले. पण त्यांना त्यात दागिने सापडले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा : Ambemohar Rice: ताटातला भात महागला! आंबेमोहरने गाठला उच्चांकी दर, कल्याणमध्ये किती रुपये किलो?
हे ही वाचा : महाप्रसादच्या प्लेटवरून पेटला वाद, राग मनात 2 दिवसांनी घेतला बदला, सांगलीत गणेशोत्सवात घडला थरार!