महाप्रसादच्या प्लेटवरून पेटला वाद, राग मनात 2 दिवसांनी घेतला बदला, सांगलीत गणेशोत्सवात घडला थरार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : गणेशोत्सवासारख्या पवित्र सणादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने माधवनगर परिसर हादरला आहे. महाप्रसादासाठी प्लेट घेण्यावरून...
Sangali News : गणेशोत्सवासारख्या पवित्र सणादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने माधवनगर परिसर हादरला आहे. महाप्रसादासाठी प्लेट घेण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता कर्नाळ रस्त्यावरील शिवतेज कॉलनीत घडली.
या हल्ल्यात हर्ष सुरेश खाडे (वय-23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हर्षचे वडील सुरेश गणपती खाडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेमके काय घडले?
दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी, माधवनगरमधील एका गणेश मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते. याच महाप्रसादाच्या वेळी, प्लेट घेण्यावरून हर्ष खाडे आणि दस्तगीर गडकरी व अमीर गडकरी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी वाद मिटला असला तरी, त्याचा राग संशयितांच्या मनात होता.
advertisement
रविवारी रात्री दस्तगीर आणि अमीर गडकरी हे हर्षच्या घरासमोर आले आणि त्यांनी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याचवेळी त्यांनी हर्षवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी दस्तगीर गडकरी आणि अमीर गडकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
हे ही वाचा : Bhandara Accident: बाप्पाचं दर्शनाला आलेल्या कुटुंबासोबत घडलं भयंकर, भंडाऱ्यात बापाचा मृत्यू, मुलगा-आई गंभीर जखमी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 9:17 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
महाप्रसादच्या प्लेटवरून पेटला वाद, राग मनात 2 दिवसांनी घेतला बदला, सांगलीत गणेशोत्सवात घडला थरार!