Bhandara Accident: बाप्पाचं दर्शनाला आलेल्या कुटुंबासोबत घडलं भयंकर, भंडाऱ्यात बापाचा मृत्यू, मुलगा-आई गंभीर जखमी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भंडारा शहरातील साई मंदिरासमोर संतोष चकोले यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी, गणेशोत्सवातील दुर्घटना.
रवी सपाटे, प्रतिनिधी भंडारा: गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सार्वजनिक गणपतीचे देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करत असतात. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबासोबत भंयकर घटना घडली आहे. गणपतीचे देखावे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबासोबत घात झाला. या भीषण दुर्घटनेत चिमुकल्या मुलानं आपल्या वडिलांना डोळ्यादेखत गमवलं. चिमुकला आणि आईने हंबरडा फोडला.
भंडारा शहरात गणपती दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गणेशोत्सव साजरा करून परत जात असताना एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई आणि चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना भंडारा शहरातील साई मंदिरासमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
advertisement
मृत व्यक्तीचे नाव संतोष चकोले वय 35 वर्षे असून ते मोहाडी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी होते. संतोष आपल्या पत्नी आणि मुलासह सायंकाळी भंडारा शहरातील गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे आणि मूर्ती पाहण्यासाठी आले होते. गणेश दर्शन करून घरी परत जात असतानाच त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली.
advertisement
धडक इतकी भीषण होती की संतोष यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी ट्रकचालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्या मुलाने वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 03, 2025 8:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhandara Accident: बाप्पाचं दर्शनाला आलेल्या कुटुंबासोबत घडलं भयंकर, भंडाऱ्यात बापाचा मृत्यू, मुलगा-आई गंभीर जखमी








