Ambemohar Rice: ताटातला भात महागला! आंबेमोहरने गाठला उच्चांकी दर, कल्याणमध्ये किती रुपये किलो?

Last Updated:

Ambemohar Rice: आंबेमोहर तांदूळ खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जातो. मोदकाची चव आणि गुणवत्तेसाठी हा तांदूळ उच्च दर्जाचा मानला जातो.

Ambemohar Rice: ताटातला भात महागला! आंबेमोहरने गाठला उच्चांकी दर, कल्याणमध्ये किती रुपये किलो?
Ambemohar Rice: ताटातला भात महागला! आंबेमोहरने गाठला उच्चांकी दर, कल्याणमध्ये किती रुपये किलो?
कल्याण : सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू असून सर्वत्र बाप्पाचा जल्लोष सुरू आहे. सध्या बाजारात गणेशोत्सवाशी निगडीत असलेल्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेशोत्सवात मोदकासाठी वापरल्या जाणाऱ्या आंबेमोहोर तांदळाच्या दराने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. आंबेमोहोर तांदूळ किरकोळ बाजारात 200 रुपये तर घाऊक बाजारात 170 ते 180 रुपये किलो दराने मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोदकासाठी आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. डिसेंबर अखेरीस नवा तांदूळ बाजारात येईपर्यंत दर चढेच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात मोदकांची मागणी वाढते, त्यामुळे आंबेमोहर तांदळाची देखील मागणी वाढते. कारण, आंबेमोहर तांदूळ खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जातो. मोदकाची चव आणि गुणवत्तेसाठी हा तांदूळ उच्च दर्जाचा मानला जातो. गेल्यावर्षी आंबेमोहोर तांदूळ बाजारात आला त्यावेळी त्याचे दर साधारणतः 60 ते 70 रुपये किलो होते. पण, गेल्यावर्षी या तांदळच्या उत्पादनातच मोठी घट झाली होती. त्यामुळे आंबेमोहर तांदळाचा पहिल्यापासून काहीसा तुटवडा जाणवत होता.
advertisement
सुगंधी तांदळासोबतच इतर प्रकारच्या तांदळाच्या दारामध्येही वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे बाजारात तांदळाच्या किमतीवर लक्षणीय प्रभाव पडला आहे. विशेषतः सुगंधी बासमती, कालीमूछ, चिनोर, इंद्रायणी यासारख्या तांदळाची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
advertisement
कल्याणमधील दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या अनियमितपणामुळे आंबेमोहर तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. तसेच सण-समारंभामुळे ग्राहकांची मागणी वाढली. त्यामुळे, तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. आंबेमोहर तांदळाच्या दरात झालेली वाढ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
आंबेमोहोर खाणारा ग्राहक हा आंबेमोहोर तांदळालाच पसंती देतो. तो अन्य तांदळाचा वापर करत नाही. अगदी परदेशातही या तांदळाला मागणी आहे. हा तांदूळ भारतातूनच निर्यात केला जातो. मर्यादित उत्पादन आणि ग्राहकांची वाढती संख्या यामुळे आंबेमोहरचे दर वाढले आहेत. या वर्षी देखील आंबेमोहर तांदळाच्या उत्पादनात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ambemohar Rice: ताटातला भात महागला! आंबेमोहरने गाठला उच्चांकी दर, कल्याणमध्ये किती रुपये किलो?
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement