गणपती विसर्जन आणि नियतीचा क्रूर खेळ
गुंजाळी गाव कोयना नदीच्या काठावर आहे. महादेव लाड शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी नदीवर गेले होते. पण त्या दिवशी गावात गणपती विसर्जन असल्यामुळे सर्वजण त्यात व्यग्र होते आणि महादेव यांच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
रात्री उशिरापर्यंत महादेव घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा कोयना नदीपात्रातील सिंचन योजनेजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. महादेव लाड यांना 'फिट्स' (फेफरे) येण्याचा आजार होता. त्यामुळे त्यांना अचानक फिट येऊन ते नदीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
या घटनेमुळे लाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : "इथे फक्त...", फायरिंग करताना हल्लेखोर काय म्हणाले? आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट!
हे ही वाचा : आयुष कोमकरची हत्या, पण खरा पिक्चर वेगळाच होता? टिपू पठाण टोळीने लावली होती फिल्डिंग, तपासात काय समोर आलं?