अतिरिक्त एसपी नितीश भार्गव यांनी सांगितले की, घरगुती वाद आणि जमिनीच्या वादाच्या रागातून महिलेने हे कृत्य केले. महिला अंगणवाडी सेविका आहे. या महिलेने देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. एफएसएल पथकाकडून तपास करण्यात येत असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडी सेविका आहे. घरात काही कौटुंबिक आणि जमिनीचा वाद होता. यामुळे महिलेने प्रथम आपल्याच पतीवर गोळीबार केला. यावेळी दिर त्याला वाचवण्यासाठी आला असता त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भावाचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
वाचा - माथेफिरुचा माजी नगरसेविकेसह मतिमंद मुलावर प्राणघातक हल्ला; विरारमध्ये थरार
जमीनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
दिराकडे काही जमीन वगैरे होती. महिलेला जमीन घ्यायची होती, पण पती या प्रकरणात रस घेत नव्हता. यामुळे पत्नीने संतापून दोघांवर गोळीबार केला. आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीश भार्गव म्हणाले की, पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार एफएसएलचे पथक पाठवून तपास करण्यात येत आहे. FSL टीम नुकतीच आली आहे. सुमारे 8 ते 10 गोळ्या झाडल्याची माहिती आहे.