समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुासर, सुनील चौडप्पा कुंभार यांनी अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर कारखान्याकडे गाळपासाठी ऊस दिला होता. मात्र ऊसाचे बिल न मिळल्याने ते आर्थिक अडचणीत होते. अखेर आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. साखर कारखान्याला ऊस घालून अनेक दिवस झाले तरी अद्याप पैसे मिळाले नव्हते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी बिलासाठी अनेक चकरा मारल्या पण त्याचा काही फायदा झाला नाही. गोकुळ शुगर कारखान्या विरोधात गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचे थकित बिलाविरोधात आंदोलन सुरू आहे.
advertisement
सुसाईड नोटमध्ये शेतकऱ्याने काय म्हटले?
सुसाईड नोटमध्ये सुनील कुंभार म्हणाले, मी सुनील कुंभार आत्महत्या करत आहे. कारण मला वेळेवर ऊसाचे बील मिळाले नाही. ट्र्रक्टरचा हफ्ता, घराचे काम आणि घेतलेल कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही.
नैराश्यातून दहा दिवसांपूर्वी विष प्यायले
सुनील कुंभार यांनी थकीत ऊस बिल आणि झालेले कर्जाच्या नैराश्यातून दहा दिवसांपूर्वी विष प्यायले होते. सोलापुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने शेतकरी सुनील कुंभार यांचा मृत्यू झाला आहे.जोपर्यंत पीडित कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निर्णय घेतला आहे.