TRENDING:

आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या चार शेतमालांमध्ये केळी,आले, गुळ आणि तीळाची आवक आणि भाव पाहू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या चार शेतमालांमध्ये केळी,आले, गुळ आणि तीळाची आवक आणि भाव पाहू.
advertisement

केळीचे आजचे दर

राज्याच्या मार्केटमध्ये 663 क्विंटल केळीची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 355 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 200 क्विंटल केळीस प्रतीनुसार 3000 ते 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय, महिन्याला शेतकऱ्याची दीड लाख उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र

advertisement

View More

गुळाची मागणी वाढली

राज्याच्या मार्केटमध्ये 3263 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1714 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4391 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये 689 क्विंटल आवक झालेल्या गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

आले दरात चढ-उतार 

राज्याच्या मार्केटमध्ये 2469 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1268 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3800 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 1500 ते 2000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

तीळाची आवक वाढली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 454 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 437 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल पांढर्‍या तीळास 9000 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल