असाच एक धक्कादायक प्रकार अक्षय कुमारच्या मुलीसोबत घडला आहे, ज्याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यामुळे हा विषय आता लोकांच्या नजरेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईत झालेल्या "सायबर अवेअरनेस मंथ" कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, त्याची 13 वर्षांची मुलगी नितारा ऑनलाइन गेम खेळताना एका अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात अडकणार होती. सुरुवातीला तो अज्ञात व्यक्ती गेमच्या माध्यमातून फक्त "थँक्यू", "शाब्बास" अशा साध्या वक्तव्यांनी संवाद साधत होता. पण नंतर त्याने तिच्याकडे अश्लील फोटो मागायला सुरुवात केली.
advertisement
त्यानंतर घाबरलेल्या निताराने लगेच गेम बंद केला आणि आपल्या आईला सर्व सांगितले. ही गोष्ट ऐकून अक्षयने पालकांना इशारा दिला आहे की, मुलांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष ठेवणे आजच्या काळात अत्यावश्यक झाले आहे. त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे सायबर गुन्हेगार आधी विश्वास संपादन करतात आणि नंतर हळूहळू चुकीच्या मागण्या करू लागतात. अशात मुलांना शक्यतो मुलींना योग्य माहिती नसेल तर त्या फसतात. अनेकदा अशा घटना ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती किंवा इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होतात.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. सायबर क्राईमची वाढती समस्या ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील मोठी चिंता आहे. विशेषत: मुली आणि लहान मुले या गुन्हेगारांचे सोपे टार्गेट ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, पालकांनी आपल्या मुलांशी ऑनलाइन जगातील धोक्यांबाबत मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. त्यांना कोणत्याही शंका किंवा त्रासदायक प्रसंगाबद्दल त्वरित सांगायला प्रोत्साहित करावे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर देखील तुमच्या मुलांशी बोला, जेणे करुन त्यांना काय चुक आणि काय बरोबर हे कळेल. तसेच मुलांच्या मोबाइल आणि गेमिंग ऍप्सवर वेळोवेळी लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अक्षय कुमारचे हे वक्तव्य केवळ एका बापाची काळजी नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी गंभीर संदेश आहे. वेळेत सावध झाल्यास आपल्या मुलांना अशा सायबर गुन्हेगारांपासून वाचवणे शक्य आहे.