TRENDING:

Amaravati News : हरितालिकेच्या दिवशीच काळाने घेतला बळी, 9 वर्षाच्या चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू

Last Updated:

Amaravati News : हरितलिकेची पूजा करण्यासाठी महिलांसोबत नदीकाठी गेलेल्या एका 9 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: हरितलिकेची पूजा करण्यासाठी महिलांसोबत नदीकाठी गेलेल्या एका ९ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाकी रायपूर येथील पूर्णा नदीपात्रात घडली. ऐन गणेशोत्सवाच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हरितालिकेच्या दिवशीच काळाने घेतला बळी, 9  वर्षाच्या चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू
हरितालिकेच्या दिवशीच काळाने घेतला बळी, 9 वर्षाच्या चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू
advertisement

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरतालिका निमित्त विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी ते भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यांचा संयोग आहे ज्याचा अर्थ अनुक्रमे अपहरण आणि स्त्री मित्र असा होतो. शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून या तत्वाचे पूजन करण्यात येते.

advertisement

या हरतालिकेच्या दिनी गावातील महिलांसोबत एक 9 वर्षांची मुलगी नदीकाठी गेली होती. मृत मुलीचं नाव ईश्वरी नांदणे (वय 9) असं आहे. गावातील परिचीत महिलांसोबत ती हरितालिकेच्या पूजेसाठी नदीकाठी गेली असताना ही दुर्घटना घडली. खेळत-खेळता ईश्वरीचा तोल जाऊन ती नदीपात्रात पडली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.

advertisement

घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ईश्वरी वाहून गेल्याच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर रात्री उशिरा ईश्वरीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

View More

या घटनेमुळे वाकी रायपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे. हरतालिकेच्या दिवशी आणि गणेशोत्सवाच्या आधी गावातील लहानगीचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नदीकिनारी पूजा वा धार्मिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित करते.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Amaravati News : हरितालिकेच्या दिवशीच काळाने घेतला बळी, 9 वर्षाच्या चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल