TRENDING:

रक्ताच्या थारोळ्यात संपला संसार! मावशीसमोर चिरला पत्नीचा गळा, दारूड्या पतीचा भयंकर कांड! वाचा सविस्तर...

Last Updated:

पुण्यातील लोहगाव, खांदवेनगर येथे दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी ममता जाधव माहेरी राहत होती. ती नांदायला परत येण्यास नकार देत असल्याने...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : कौटुंबिक वाद आणि नांदायला येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने थेट घरात घुसून पत्नीच्या गळा चिरून निर्घृण खून केला. पुण्यातील लोहगाव येथील खांदवेनगर भागात रविवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ममता प्रेम जाधव (वय-21) असे हत्या झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या क्रूर कृत्यानंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
Crime News
Crime News
advertisement

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या प्रकरणी मयत ममताची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (वय-२८) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता आणि तिचा पती प्रेम उत्तम जाधव (वय-27) हे मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांचे 2020 साली लग्न झाले होते. मात्र, प्रेमला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि तो यावरून ममताला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. पतीच्या या रोजच्या जाचाला कंटाळून ममता गेल्या सहा महिन्यांपासून लोहगाव येथे आपल्या आई आणि मावशीसोबत राहत होती. प्रेम तिला सतत फोन करून घरी परत येण्यासाठी दबाव टाकत होता, पण 'तुम्ही दारू सोडल्याशिवाय मी नांदायला येणार नाही,' अशी ठाम भूमिका ममताने घेतली होती.

advertisement

अन् पतीने साधला डाव...

रविवारी ममता आणि तिची मावशी रेश्मा यांना सुट्टी असल्याने त्या घरीच होत्या. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पती प्रेम तिला घरी नेण्याच्या बहाण्याने तेथे आला. त्याने घरात खुर्चीवर बसून ममताच्या चुलत्याला फोन लावला आणि ममताला नांदायला पाठवण्याबद्दल बोलला. बोलणे झाल्यावर त्याने तोच फोन मावशी रेश्मा यांच्याकडे दिला आणि 'तुम्ही बोला' असे सांगितले. रेश्मा फोनवर बोलण्यासाठी खोलीच्या बाहेर आल्या आणि हीच संधी साधून प्रेमने ममतावर हल्ला चढवला.

advertisement

रक्ताच्या थारोळ्यात संपवला संसार

रेश्मा खोलीबाहेर असतानाच आतून लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्या घाबरून पुन्हा खोलीत गेल्या, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपी प्रेमने एका हाताने ममताचे तोंड दाबले होते आणि दुसऱ्या हातातील चाकूने तिचा गळा चिरत होता. ममताच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रेश्मा यांनी हिंमत दाखवून प्रेमचा हात पकडला आणि त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांच्यावरही वार करून त्यांना ढकलून दिले आणि घरातून पळ काढला.

advertisement

रेश्मा यांनी आरडाओरड करताच शेजारी धावून आले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ममताला रिक्षातून तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, जखम मोठी असल्याने डॉक्टरांनी तिला ससून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचालकाच्या मदतीने तिला ससूनमध्ये दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.

advertisement

हे ही वाचा : "तू माझ्यासाठी काय मिळवलंस?" म्हणत, दारूड्या पोराने संपवलं बापाला, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य!

हे ही वाचा : पत्नीशी करत होता चॅटिंग, पती तुरुंगातून आला बाहेर, 'त्या' तरुणाचं केलं अपहरण अन् इतका मारला की...

मराठी बातम्या/क्राइम/
रक्ताच्या थारोळ्यात संपला संसार! मावशीसमोर चिरला पत्नीचा गळा, दारूड्या पतीचा भयंकर कांड! वाचा सविस्तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल