पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणाचे या घटनेतील मृत तरूणीवर प्रेम होते. पण मृत मुलगी या तरूणावर प्रेम करायचीच नाही. त्यामुळे तरूणाचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. यातून तरूण मुलीची सतत छेड काढायचा, तिला चिठ्ठ्या पाठवून भेटायची मागणी करायचा. मुलाच्या या सततच्या त्रासाला कंटाळुन मुलीने संबंधित प्रकार आई वडिलांना सांगितला होता. त्यानंतर आई वडिलांनी मिळून तरूणाला समज दिला होता.
advertisement
कुटुंबियांनी तरूणाला समज दिल्यानंतर तो सुधरेल असं मुलीला वाटलं होतं.मात्र तसं काहीच झालं नाही. आणि तरुणाने पुन्हा मुलीची छे़ड काढायला, तिला चिठ्ठ्या पाठवून भेटायची मागणी करायला सूरूवात केली होती. त्यामुळे तरूणाचा हा त्रास संपत नसल्याने अखेर मुलीने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तरूणाच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या या मुलीने अखेर बुधवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर सदर मुलीच्या पित्याने फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंकतर आरोपीवर गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील करण्यात आली होती.या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
