रणजीत धुर्वे असं अटक केलेल्या २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. ते एका इमारतीच्या बांधकामस्थळी मजूर म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपला मित्र सवादच्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने मित्राच्या पत्नीकडे जेवण मागितलं. पण मित्राच्या पत्नीने जेवण देण्यास नकार दिला. हा राग मनात घरून आरोपी धुर्वे यानं पीडित दाम्पत्याच्या साडेचार वर्षांच्या मुलींचं अपहरण केलं.
advertisement
आरोपी पीडित मुलीला घेऊन थेट मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं गेला होता. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट ४ ने मोठी कारवाई केली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. यावेळी आरोपी बुधवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकावरून गोरखपूर मेलमध्ये चढल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी छिंदवाडा पोलिसांशी संपर्क साधून धुर्वेला अटक केली. तसेच अपहरण झालेल्या चिमुकल्या मुलीची सुटका केली.
पोलिसांनी अवघ्या १७ तासांत गुन्ह्याच्या छडा लावून मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सवाद दाम्पत्य हे मजूर असून ते बदलापूर परिसरातील रमेशवाडी भागात एका बांधकाम स्थळी राहतात. त्यांना साडेचार वर्षांच्या दोन जुळ्या मुली आणि एका मुलगा आहे. याच ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी आरोपी धुर्वे मजूर म्हणून कामाला आला होता. पीडित मुलीचा वडील आणि आरोपी हे मित्र आहेत. मात्र केवळ जेवण न दिल्याच्या कारणातून आरोपीनं मित्राच्या मुलीचं अपहरण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उल्हासनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
