TRENDING:

1813 किमी अंतरावरून जालन्यात आले, 2 चोरीत 15000 चोरले; आता कोर्टाने सुनावला 500 रुपयांचा दंड आणि...

Last Updated:

या नागरिकांना काम मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यामुळे हे नागरिक गुन्हेगारीकडे वळतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : देशातील बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची मागणी नेहमीच होत असते. गरिबी आणि सुरक्षित भविष्याच्या शोधात अनेक बांगलादेशी नागरिक देश सोडून भारतात अवैध प्रवेश करतात. या नागरिकांना काम मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यामुळे हे नागरिक गुन्हेगारीकडे वळतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला होता.
AI imgae
AI imgae
advertisement

भारतात अवैध मार्गाने प्रवेश करून चोरीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना जालना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कुर्बान शाहीन आलम मंडाल, जाकेर फकीर बारीक फकीर शेख आणि शुमोन जुबेद अली शेख, सलमान शुमोन शेख अशी चार बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

रिलस्टार निर्मला नवले जिंकल्या असत्या, फक्त कमी पडली इतकी मतं, कारण समोर Video

advertisement

परतूर येथील एका घराच्या लोखंडी खिडकीचे ग्रिल कटरने तोडून घरात प्रवेश करून कपाटातून 5,000 रुपये रोख चोरले होते. तसेच बनावट ओळखपत्र तयार करून ते नष्ट केले. तर दुसऱ्या गुन्ह्यांत आरोपींनी 9 मार्च 2024 रोजी रात्री अंदाजे 2.30 वाजता सीतानंद पार्क, परतूर येथील एका घराच्या मागील खिडकीचे ग्रिल तोडून प्रवेश केला अन कपाट तोडून 10,000 रुपये रोख चोरले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. केंद्रे यांनी केला आणि दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयासमोर आरोपींनी गुन्हा कबूल केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जयश्री बी. सोळंके यांनी युक्तिवाद केला. प्रत्येक आरोपीला प्रत्येक कलमांतर्गत 2 वर्षे कारावास आणि 500 रुपये दंड दंड न भरल्यास 2 दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली गेली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
1813 किमी अंतरावरून जालन्यात आले, 2 चोरीत 15000 चोरले; आता कोर्टाने सुनावला 500 रुपयांचा दंड आणि...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल