TRENDING:

एका महिन्यात तीनदा विकलं, 21 वर्षीय विवाहितेसोबत भयंकर घडलं, बीडला हादरवणारी घटना

Last Updated:

Beed News: 6 मार्च रोजी पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्याचा दबाव टाकण्यात आला. भीतीने तिनं टोकाचं पाऊल उचललं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय विवाहित तरुणीला पैशांच्या लालसेपोटी एका महिन्यात तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रत्येक ठिकाणी तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. सततच्या या अमानुष वागणुकीमुळे आणि मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
Beed News: पैशांसाठी माणुसकीचा सौदा! 21 वर्षीय तरुणीला एका महिन्यात तीनदा विकलं, ‘त्या’ घटनेनं बीड हादरलं!
Beed News: पैशांसाठी माणुसकीचा सौदा! 21 वर्षीय तरुणीला एका महिन्यात तीनदा विकलं, ‘त्या’ घटनेनं बीड हादरलं!
advertisement

पीडित तरुणी लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे पहिले लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र पतीच्या गैरवर्तनामुळे ती माहेरी राहत होती. त्याच दरम्यान तिची ओळख पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या महानंदा नावाच्या महिलेशी झाली. या महिलेनं दुसरे लग्न करून देण्याचे आश्वासन देत तिला पुण्यात नेले. तेथे अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

advertisement

Beed: जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा, जावई पिकात लपून बसला अन्...

या लग्नाला अवघे दहा दिवस झाले असतानाच संबंधितांनी तिला त्या ठिकाणाहून काढून दुसऱ्या व्यक्तीकडे साडेचार लाख रुपयांत विकले. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. महानंदा आणि तिच्या साथीदारांनी तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने पुन्हा एकदा 4 मार्च 2026 रोजी आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावले. या व्यवहारातूनही साडेचार लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे लग्नाच्या नावाखाली महिलांची विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

advertisement

View More

महिलेवरचा अत्याचार इतक्यावरच थांबला नाही. 6 मार्च रोजी पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्याचा दबाव टाकण्यात आला. वारंवार होत असलेल्या या व्यवहारांमुळे आणि भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली आली. अखेर या असह्य परिस्थितीमुळे तिने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणी आष्टी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये महानंदा, तिचा पती तसेच तुळजापूर येथील आणखी दोन जणांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 आणि 61 अंतर्गत मानवी तस्करी व फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या आंतरजिल्हा रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
एका महिन्यात तीनदा विकलं, 21 वर्षीय विवाहितेसोबत भयंकर घडलं, बीडला हादरवणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल