समोर आलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये अविनाशच्या डोक्यात सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात अविनाशचा जागीच मृत्यू झाला आहे. वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी झाली याबात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पीलस तपास करत असून अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकी हत्या कशी झाली?
समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश दरबार हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलमध्ये बसलेला असताना अचानक तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले आणि त्यानंतर आरोपी फरार झाले. मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अविनाश देवकर याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचे देखील समोर येत आहे. अंबाजोगाई शहर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर
बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर आहे. काही केल्या त्याला आळा बसत नाही. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंडांची धमक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. हे कधी थांबेल? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. .या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
