अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26 ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मैत्रिणीसह दोघांना अटक केली आहे. वृंदावनी फरताडे व अल्पवयीन मुलाला अटक केली आहे ताब्यात घेतले आहे अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी दिली.
बॉयफ्रेंड ठरला अडसर
अयोध्याचे पतीचं चार वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. अयोध्याला तीन वर्षाची ईश्वरी नावाची मुलगी असून, ती सासूकडे गावी असते. अयोध्या या होमगार्ड म्हणून काही महिन्यांपूर्वी भरती झाल्या होत्या. त्या बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीचीही तयारी करत होत्या. वृंदावनी फरताडे नावाची त्यांची मैत्रीण होती. वृंदावनी फरताडे आणि एका राठोड नावाच्या मुलाचे प्रेम प्रकरण सुरू होते.
advertisement
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
काही कालावधीने आयोध्याची ओळख राठोडसोबत झाली. राठोडने फरताडेला दूर करत अयोध्याला जवळ केले. हाच राग फरताडेच्या डोक्यात होता. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरी बोलावले. फरताडेने तिच्या मुलाच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला.आरोपींनी अयोध्याचा यांचा खून केल्यानंतर काही वेळ मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यावर विचार केला. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला. त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटीवर घेऊन बीड शहरापासून दूर नेऊन नाल्यात फेकला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
