दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या या युवकाचे नाव लक्ष्मण सपकाळ (वय 25, रा. सुर्डी, ता. गेवराई) असे आहे. त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही वडवणी तालुक्यातील असून सध्या बीडमधील एका भाड्याच्या घरात राहते. ती आणि आरोपी लक्ष्मण हे दोघेही एका खासगी रुग्णालयात काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण पीडितेच्या राहत्या घरावर सतत चकरा मारत होता. 12 मे रोजीही तो मद्यधुंद अवस्थेत तिच्या रूमवर यायचा हट्ट करत होता. पीडितेने सकाळी यायला सांगितले तरी त्याने ऐकले नाही.
advertisement
पहाटेच तिच्या खोलीत घुसून, ‘माझा फोन का उचलत नाहीस?’ अशी विचारणा करत गळा दाबला आणि चापटाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी तो सातत्याने जातीवाचक शिवीगाळ करत होता, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घाबरलेल्या तरुणीने तातडीने आपल्या दाजीला बोलावले असता, लक्ष्मण याने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी त्वरित लक्ष्मणविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
