TRENDING:

लग्नात बदनामीची भीती, रात्रीच मित्राचा काटा काढला, बीडच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा

Last Updated:

Beed Crime: लग्नाच्या दिवशी बदनामी होईल, या भीतीने तो अस्वस्थ झाला होता. अवघ्या पंधरा तासांत पोलिसांनी त्या प्रकरणाचा छडा लावला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: गेल्या काही काळात बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. नुकतेच शिरूरकासार तालुक्यातील डोंगरदेवी–दगडवाडी शिवारात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पंधरा तासांत आरोपीला अटक करून तपासात मोठे यश मिळवले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय 30) असून, धक्कादायक बाब म्हणजे त्याचा जिवलग मित्र अतिक गुलाब तांबोळी यानेच पैशांच्या वादातून त्याचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
लग्नात इज्जत जाईल याची भीती, मित्रानेच मित्राला संपवलं, बीडच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा
लग्नात इज्जत जाईल याची भीती, मित्रानेच मित्राला संपवलं, बीडच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा
advertisement

पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, चांद याने अतिककडे दीड लाख रुपयांची रक्कम दिली होती. या पैशांच्या परतफेडीसाठी तो सातत्याने तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारी लग्न ठरले होते. पैसे न दिल्यास लग्नसमारंभात जाऊन गोंधळ घालण्याची धमकी चांदने दिल्याने अतिक मानसिक तणावात होता.

70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!

advertisement

लग्नाच्या दिवशी बदनामी होईल, या भीतीने तो अस्वस्थ झाला होता. या तणावातूनच रविवारी रात्री अतिकने चांदला भेटून त्याच्याशी वाद घातला. वाद वाढत गेल्यानंतर अतिकने दगडाने ठेचून चांदची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, हत्या होण्यापूर्वी दोघेही दिवसभर एकत्र फिरत होते. त्यांनी एकत्र जेवणही केले होते. त्यानंतर दोघे स्वतंत्र दुचाकींवरून गावाकडे निघाले होते.

advertisement

View More

दरम्यान, अर्ध्या वाटेत एका हॉटेलजवळ चांदने आपली दुचाकी थांबवून पुतण्याला फोन करून ती घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाला. सोमवारी सकाळी शेतशिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अतिक तांबोळी याला मध्यरात्री बीड शहरातून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
लग्नात बदनामीची भीती, रात्रीच मित्राचा काटा काढला, बीडच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल