ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडल्यास माहिती समोर आली आहे. एका वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार , रविवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान एसपी कावत हे त्यांच्या पत्नीसोबत बंगल्याच्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संशय वाढला. काही वेळाने दरवाजा उघडण्यात आला आणि त्या वेळी आत गांजाचा तीव्र वास पसरलेला होता.
advertisement
घरातच केले गांजाचे सेवन...
दरवाजा उघडणारा पोलिस शिपाई बाळू बहिरवाळ हा नशेच्या अवस्थेत असल्याचं एसपी कावत यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्वरित कारवाई करत एसपी कावत यांनी संबंधित पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या वैद्यकीय चाचणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर बाळू बहिरवाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
