बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे. माहेरून दहा लाख रुपये आण, अशी मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पोलीस पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विनोद सखाराम कुटे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो बीड पोलीस दलात कार्यरत आहे. याप्रकरणी पत्नी रेणुका विनोद कुटे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सीता सखाराम कुटे, रोहिणी गोविंद गाडे आणि गोविंद बाबासाहेब गाडे असं गुन्हा दाखल झालेल्या इतर तीन आरोपींची नावं आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस पतीकडून दहा लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केला जात होता. आरोपी विनोद चारचाकी घेण्यासाठी रेणुकाचा छळ करत होता. माहेरून दहा लाख रुपये आण, अशी मागणी करत तो रेणुकाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
