मसाला पायनापलसाठी लागणारे साहित्य
चार ते पाच अननसाच्या काप, लाल तिखट, जिरे पूड, काळे मीठ, चाट मसाला, मीठ, लिंबाची फोड, एवढे साहित्य लागेल.
मसाला पायनापल कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये अननसाच्या फोडी टाकून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता म्हणजे की तुम्हाला जेवढे तिखट लागते त्याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा अर्धा चमचा. त्यानंतर जिरेपूड टाकायची पाऊण चमचा. त्यानंतर काळं मीठ चवीनुसार आणि आपलं जे रेगुलर मीठ असतं ते पण चिमूटभर टाकायचं आणि यावरती आपण जी लिंबाची फोड घेतली होती ती टाकून घ्यायची. हे सर्व एकत्र पूर्ण एकजीव करायचं आणि ते सर्व अननसाच्या फोडीला लागेल त्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचं.
advertisement
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
अशा पद्धतीने आपलं हे मसाला पायनापल घरी बनवून तयार होते. अगदी झटपट आणि मोजून पाच मिनिटांमध्ये रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा.





