Strawberry Recipe: स्ट्रॉबेरी खायला नको वाटतंय? घरीच ट्राय करा कॅफेस्टाईल मिल्कशेक, सोपी रेसिपी, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Strawberry Recipe: बाजारात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी आलेल्या आहेत. तुम्ही घरीच ही खास रेसिपी बनवू शकता.
छत्रपती संभाजीनगर: सध्या स्ट्रॉबेरीचा सिझन सुरू आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी आलेल्या आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खायला आवडतात. तर याच स्ट्रॉबेरीपासून आपण घरगुती ड्रिंक देखील बनवू शकतो. छत्रपती संभाजीनगरमधील गृहिणी ऋतुजा पाटील यांनी स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी सांगितली आहे.
स्ट्रॉबेरी मिल्क शेकसाठी लागणारे साहित्य
10 ते 15 फ्रीज केलेल्या स्ट्रॉबेरी, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम, दोन ग्लास दूध एवढे साहित्य आवश्यक आहे.
स्ट्रॉबेरी मिल्क शेक रेसिपी
सगळ्यात पहिले आपण घेतलेल्या स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याला साधारणपणे दोन ते तीन तास फ्रीजरमध्ये ठेवायच्या. जेणेकरून आपला स्ट्रॉबेरी शेक चांगला होऊ शकतो. फ्रीजमधून काढलेल्या स्ट्रॉबेरी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची. साखर तुमच्या आवडीनुसार घ्यायची. स्ट्रॉबेरी आंबट असतील तर साखर जास्त वापरू शकता. तर तुम्ही डाएटचा विचार करत असाल तर साखरेऐवजी तुम्ही मध देखील वापरू शकता.
advertisement
स्ट्रॉबेरीसोबत त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे आहे. तसेच दोन ग्लास दूध घालायचे आहे. हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं. गरजेनुसार यामध्ये अगदी आईसक्यूब देखील टाकता येतं. अशा पद्धतीने हा स्ट्रॉबेरी मिल्क शेक बनवून तयार होतो. मोजून पाच मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते.
दरम्यान, तुम्हाला देखील काही हटके ट्राय करायचं असेल तर अगदी कमी साहित्यात घरच्या घरी तुम्ही स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवू शकता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 2:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Strawberry Recipe: स्ट्रॉबेरी खायला नको वाटतंय? घरीच ट्राय करा कॅफेस्टाईल मिल्कशेक, सोपी रेसिपी, Video








