TRENDING:

'कॅबिनमध्ये बोलवायचे, कपडे काढायला लावून...', 2 नराधम शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा छळ, बीडला हादरवणारी घटना

Last Updated:

Crime in Beed: बीडमध्ये शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. आता शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे. पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर दोन शिक्षकांनी मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला आहे. आरोपींनी तिला कपडे काढायला लावल्याचा आरोप देखील पीडित मुलीनं केला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
News18
News18
advertisement

विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम शिक्षकांचं नाव आहे. ते दोघं बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत देखील फोटो आहेत. अशा राजकीय कनेक्शन असलेल्या शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक क्षळ केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

advertisement

पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने एप्रिल 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीट चे क्लासेस लावले होते. ती सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत क्लासेसच्या अभ्यासिकेत अभ्यास करायची. तर दुपारी २ ते ६ या कालावधीत तिचे लेक्चर्स असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर याने मुलींचा छळ करायला सुरुवात केली होती. मुलगी दुपारी बारा वाजता अभ्यासिकेतून बाहेर पडल्यानंतर आरोपी खाटोकर अभ्यासिकेच्या खाली जाऊन थांबायचा. माझ्यासोबत चल, गाडीवर बस, मी तुला घरी सोडतो, असं आरोपी शिक्षक म्हणायचा. यासाठी विद्यार्थिनीने त्याला विरोध केल्यानंतर तो तिच्यावर दबाव टाकून बसवून घेऊन जायचा.

advertisement

दुपारी 02.0 ते दुपारी 06.00 पर्यंत क्लास झाल्यानंतर प्रशांत खाटोकर पीडित मुलीला एकटीला कॅबिनमध्ये बोलवून घ्यायचा. तिथे तो अश्लील स्पर्श करायचा. एवढेच नव्हे तर तो अंगावरील कपडे काढायला लावून, तिचे अश्लील फोटो काढायचा, असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. क्लास सुरू असताना कधी कधी तो क्लासरुममध्येही चुकीचा स्पर्श करायचा. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास किंवा घरी सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकीही खाटोकर द्यायचा, असा आरोप पीडितेनं केला आहे.

advertisement

या प्रकाराबाबत जेव्हा पीडित मुलीने दुसरा शिक्षक विजय पवार याला सांगितलं. तेव्हा त्यानेही आपल्यासोबत अश्लील वर्तन करायला सुरूवात केली. आम्ही खोटोकर याला मुलींना त्रास देण्यासाठी ठेवलं आहे, असं म्हणत विजय पवारनेही पीडितेशी अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. कॅबीनमध्ये कुणी नसताना तो अंगाला चुकीचा स्पर्श करायचा. इतर विद्यार्थी दुसऱ्या क्लासला गेले की, तो एकटीला बाजुला बोलवायचा. थांबवून ठेवायचा. यामुळे क्लासमधील सर्व विद्यार्थी माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे, अशी आपबिती पीडितेनं सांगितलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

अखेर दोन्ही नराधम शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. यानंतर वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. राजकीय कनेक्शन असलेल्या आणि एका प्रसिद्ध क्लासमधील शिक्षकांनी अशाप्रकारे विद्यार्थिनीचा छळ केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
'कॅबिनमध्ये बोलवायचे, कपडे काढायला लावून...', 2 नराधम शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा छळ, बीडला हादरवणारी घटना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल