TRENDING:

'कॅबिनमध्ये ये, कपडे काढ', बीडच्या नराधम शिक्षकाची आणखी एक विकृती, 'फी न दिल्याने मुलीला...'

Last Updated:

Crime in Beed: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फीस न दिल्याचे कारण सांगत आरोपीनं पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केलं होतं.
News18
News18
advertisement

या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या पालकांनी आता गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी विजय पवारने आपल्या मुलीचा विनयभंग केला होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीनं पीडितेच्या जातीचा उल्लेख करत विनयभंग केला होता. तिच्याशी अश्लील वर्तन केलं होतं. त्यावेळी हा गुन्हा दाखल केला नव्हता. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

विजय पवार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून चौकशीसाठी पोलीस आता पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागू शकतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बीडमध्ये भेट देत पोलिसांना या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलातील मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. आता विजय पवार यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहे. अशाप्रकारे आणखी कोणासोबत आरोपीनं अशाप्रकारे विकृत कृत्य केलं असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

advertisement

हेही वाचा- 'यू लूक हँडसम', मुंबईत डेटींग अॅपवर नवा स्कॅम, तरुणी हॉटेलमध्ये भेटायला बोलवते मग घडतं नको तेच, रॅकेटचा पर्दाफाश!

नेमकं प्रकरण काय?

आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघं बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. दोघांनी उमा किरण शैक्षणिक संकुलात क्लासेससाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. मागील दहा महिन्यांपासून आरोपी तिचं शोषण करत होते.

advertisement

पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने एप्रिल 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीट चे क्लासेस लावले होते. ती सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत क्लासेसच्या अभ्यासिकेत अभ्यास करायची. तर दुपारी २ ते ६ या कालावधीत तिचे लेक्चर्स असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर याने मुलींचा छळ करायला सुरुवात केली होती. मुलगी दुपारी बारा वाजता अभ्यासिकेतून बाहेर पडल्यानंतर आरोपी खाटोकर अभ्यासिकेच्या खाली जाऊन थांबायचा. माझ्यासोबत चल, गाडीवर बस, मी तुला घरी सोडतो, असं आरोपी शिक्षक म्हणायचा. यासाठी विद्यार्थिनीने त्याला विरोध केल्यानंतर तो तिच्यावर दबाव टाकून बसवून घेऊन जायचा.

advertisement

कॅबिनमध्ये बोलवून अश्लील स्पर्श करायचा नराधम

दुपारी 02.0 ते दुपारी 06.00 पर्यंत क्लास झाल्यानंतर प्रशांत खाटोकर पीडित मुलीला एकटीला कॅबिनमध्ये बोलवून घ्यायचा. तिथे तो अश्लील स्पर्श करायचा. एवढेच नव्हे तर तो अंगावरील कपडे काढायला लावून, तिचे अश्लील फोटो काढायचा, असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. क्लास सुरू असताना कधी कधी तो क्लासरुममध्येही चुकीचा स्पर्श करायचा. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास किंवा घरी सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकीही खाटोकर द्यायचा, असा आरोप पीडितेनं केला आहे.

ज्याला मदत मागितली, त्यानेही अश्लील वर्तन केलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल
सर्व पहा

या प्रकाराबाबत जेव्हा पीडित मुलीने दुसरा शिक्षक विजय पवार याला सांगितलं. तेव्हा त्यानेही आपल्यासोबत अश्लील वर्तन करायला सुरूवात केली. आम्ही खोटोकर याला मुलींना त्रास देण्यासाठी ठेवलं आहे, असं म्हणत विजय पवारनेही पीडितेशी अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. कॅबीनमध्ये कुणी नसताना तो अंगाला चुकीचा स्पर्श करायचा. इतर विद्यार्थी दुसऱ्या क्लासला गेले की, तो एकटीला बाजुला बोलवायचा. थांबवून ठेवायचा. यामुळे क्लासमधील सर्व विद्यार्थी माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे, अशी आपबिती पीडितेनं सांगितलं आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
'कॅबिनमध्ये ये, कपडे काढ', बीडच्या नराधम शिक्षकाची आणखी एक विकृती, 'फी न दिल्याने मुलीला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल